Devendra Fadnavis reaction on Maharashtra budget e sakal
महाराष्ट्र बातम्या

अर्थसंकल्पात आमच्याच योजनांचा पाढा ; फडणवीसांचा हल्लाबोल

गरीब, बारा बलुतेदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य सरकारकडून आज सादर करण्यात आलेल्या योजना म्हणजे भाजपने यापूर्वी केलेल्या घोषणांचाच पाढा यंदाच्या अर्थसंकल्पात वाचला गेला आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गरीब, बारा बलुतेदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे. आम्ही या ठाकरे सरकारच्या या बजेटचा धिक्कार करतो असे फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले.

आताचा जो अर्थसंकल्प(Budget) मांडला तो कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. बजेटवरून चार बातम्या तयार होऊ शकतात. यापलिकडे काहीच नाही असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. विशेषता मागच्या बजेटमधील घोषणा करणे, चालू कामाच्या घोषणा करणे या आमच्या सरकारने केलेल्या घोषणा यांनी केल्या समृद्धी महामार्गाला, पवारांसह मुख्यमंत्र्यांनी विरोध केल्याचे सांगत मुंबई मेट्रो, ट्रान्स हार्बर, बुलेट ट्रेनला विरोध केल्याची आठवणही यावेळी फडणवीस यांनी यावेळी करून दिली. मात्र आता त्याच योजनांची घोषणा करण्यात येत असून, याचा आनंद आहे असल्याचे ते म्हणाले.

सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही विशेष तरतूद करण्यात आलेली नसून, दोन वर्षात शेतकरी उद्धवस्त झाला, त्याला मदत करण्याऐवजी वर कर्ज किती दिले ते सांगितले. मात्र खाती सांगितली नाही. याचे मुख्य कारण कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत घट झाली, कर्जमाफी सांगितलेल्यांना कर्ज दिलेलं नाही असे फडणवीस म्हणाले. नैसर्गिक संकटं ओढावलेल्यांना मदत मिळालेली नसल्याचे सांगत कोरोना काळात सर्वाधिक लोक मृत्यूमुखी पडले अशा राज्याचं सरकार कशाच्या आधारावर सरकार पाठ थोपटून घेतंय याची लाज आम्हाला वाटते असा देखील हल्लाबोल फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला आहे.

सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात काही विशिष्ट घोषणा सोडल्या तर समाजाला काहीच दिलं नाही. पेट्रोल डिझेलचा (Petrol) कर कमी करून अनेक राज्यांनी सामान्यांना दिलासा दिला, मात्र महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य ज्याची अर्थव्यवस्था चांगली आहे त्या राज्यात पेट्रोल डिझेलचा कर कमी करण्यासाठी फुटकी कवडीही दिली नाही. सायकलवरून मोर्चा काढणारे पटोले आता कोणता मोर्चा काढणार हे सांगितलं पाहिजे असे फडणवीस म्हणाले.

अर्थसंकल्पात मराठवाडा ग्रीड यासाठी एकही नवा पैसा दिला नाही, मराठवाडा ग्रीडची हत्या या सरकारने केली असून, दुष्काळमुक्तीचे सिंचन प्रकल्प, वाहून जाणारे पाणी, विदर्भ, मराठवाड्यात आणण्याच्या योजनेसाठी काहीच करण्यात आलेले नसून, उत्तर महाराष्ट्र तर या अर्थसंकल्पात दिसतच नसून राज्याच्या नकाशात उत्तर महाराष्ट्र असल्याचा सरकारला विसर पडला असल्याची खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT