devendra fadnavis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

'गाडी, घर सोडून ते एसटीने घरी आले होते; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला गणपतरावांचा 'तो' किस्सा

देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

सकाळ डिजिटल टीम

Deputy CM Fadanvis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार एकाच मंचावर उपस्थित होते. सांगोल्यात स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकारचे अनावरण आणि महाविद्यालय नामांतर सोहळ्यासाठी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील देखील उपस्थित होते.

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे रविवारी (ता. 13) रोजी स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांचे महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळ्यासाठीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आयोजन करण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गणपतराव देशमुखांच्या कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जेव्हा पवार साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली तेव्हा,जेव्हा १९८०मध्ये इंदिरा गांधींनी सरकार बरखास्त केलं, तेव्हा गाडी, घर सोडून एसटीने घरी आले होते.

कारण,कोणत्याचं मंत्रीपदाच्या मोहात ते अडकलेच नाही. विरोधी पक्षात राहून आपण कसं प्रभावीपणे काम करु शकतो,हे आम्हाला कुणाकडून शिकता आलं, तर आबासाहेबांमुळे शिकता आलं. एकलव्याने जसं धनुर्विद्येच शिक्षण घेतलं, तशाच प्रकारे त्यांचा एकलव्य म्हणून अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT