Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team eSakal
महाराष्ट्र

"...किती हा भाबडेपणा?"; फडणवीसांची पवारांवर खोचक टीका

सुधीर काकडे

शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेत राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळावर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी शरद पवार यांनी २०१९ साली महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असतानाची एक घटना सांगितली. राज्यात सरकार स्थापन होत नसल्याने सर्व पक्षांची खलबतं पार पडत होती. यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते, मात्र आपण त्यांचा हात धरून वर केला असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री होण्यास तयार नसलेल्या उद्धव ठाकरेंना तयार होण्यास सांगण्यावरून फडणवीसांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. "द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?" असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका केली. एवढ्यावरच न थांबता "साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !" अशी टीपण्णी देखील फडणवीसांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT