Devendra Fadnavis On Nawab Malik Resignation Uddhav Thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

'बाळासाहेबांना सांगू, तुमचा सुपूत्र...', फडणवीसांचं ठाकरेंना भावनिक आवाहन

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis on Nawab Malik Resignation : मुंबई : नवाब मलिकांवर ईडीची कारवाई झाल्यानंतर ते तुरुंगात आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज आझाद मैदानावरून विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) नाव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Maharashtra CM Uddhav Thakceray) भावनिक आवाहन केले. तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर द्याल? असं फडणवीस म्हणाले.

हा संघर्ष देशद्रोह्यांच्याविरोधात आहे. पाकिस्तानी लोकांसोबत मिळून काम करत असलेल्या लोकांविरोधात हा संघर्ष आहे. मलिकांनी बॉम्बस्फोटांच्या आरोपीकडून जमीन विकत घेतली. पण, त्यांचा राजीनामा अजून घेतला नाही. ही घटना राज्यासाठी लाजीरवाणी आहे. सरदार शाहवली खान याने याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचं प्रशिक्षण घेतलं. त्याने बॉम्बस्फोट घडवून आणला. तो आजही तुरुंगात आहे. दाऊदची बहीण हसीना पारकरचा फ्रंट मॅन हा सलीम पटेल या दोघांनी मिळून हे षडयंत्र रचलं. एका बाईची जमीन हडपली. त्यांनी ही जमीन सॉलिडस इंफ्रास्ट्रक्चरला विकली. ही कंपनी नवाब मलिकांची आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी जे तुरुंगात आहेत त्यांच्याकडून तुम्ही कवडीमोल भावात विकत घेतली. तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा घेत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'उद्धवजी...'

उद्धवजी तुमचं आमचं नसेल जमत तर सोडून द्या. एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. त्यावेळी बाळासाहेब तुम्हाला विचारतील, की ''बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेणारा मंत्री तुमच्या मंत्रीमंडळात होता.'' त्यावेळी तुम्ही काय उत्तर द्याल. त्यावेळी आम्ही बाळासाहेबांना सांगू, की आम्ही संघर्ष केला. पण, काय करायचं की तुमचे सुपूत्र मुख्यमंत्री होते. ते सत्तेसाठी आंधळे झाले होते. राजीनामा मागितला तर माझं सरकार जाईल याची त्यांना भीती होती, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना भावनिक आवाहन केलं.

आता एक-एक बॉम्ब फोडणार -

आपल्याकडे खूप सारे बॉम्ब आहेत. पण, एकावेळी फोडणार नाही. हळूहळू सर्व समोर आणू. आता आम्ही घाबरणार नाही. आम्ही मोदींचे सैनिक आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मंत्री संजय राठोड याचं वर्चस्व कायम; यवतमाळमधील दारव्हा, नेर पालिकेवर नगराध्यक्ष विजयी

Nagar Panchayat News Sangli : हाय व्होल्टेज ड्रामा झालेल्या सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेत कोणाची आली सत्ता, जयंत पाटील गेमचेंजर

Sangli : आटपाडीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण नगराध्यक्षपद भाजपकडे; पडळकरांचा दे धक्का

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

SCROLL FOR NEXT