Devendra fadnavis-Sharad Pawar e sakal
महाराष्ट्र बातम्या

'समजत नाही अशी मंडळी बोलतात', फडणवीसांचा पवारांना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्राने दिवाळीच्या मुहूर्तावर अचानक पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel prices) कमी केले. त्यानंतरही काही राज्यांनी देखील इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकचा देखील समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कधी कमी करणार? असा प्रश्न शरद पवारांना (Sharad Pawar) विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी जीएसटीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. त्यालाच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहे.

बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांचा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच पेट्रोल-डिझेल दराच्या बाबतील राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे. पण, केंद्राने राज्याचे जीएसटीचे पैसे अजूनही दिले नाहीत. केंद्राने ते पैसे दिले तर राज्याला जनतेच्या सोयीचे निर्णय घेणे सोपे जाईल, असं पवार म्हणाले होते.

दरम्यान, “मी दुर्दैवाने म्हणतो की ज्यांना काही समजतच नाही, अशी मंडळी यात बोलत आहेत. जीएसटीची रक्कम मिळतेय. गेल्या वर्षीही ही रक्कम मिळाली. यंदा देखील मिळणार आहे. जीएसटीचं रक्कम कुठेच जात नाही. पण केंद्रानं ५ रुपये कर कमी केला की आपोआप ७ रुपये टॅक्स कमी होतो. हाच कर १०-१२ रुपयांनी कमी करा, असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT