Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीत जातो असं फडणवीस म्हणाले होते; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

Uddhav Thackeray Big claim: देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करुन मी दिल्लीच्या राजकारणात जातो असं म्हटलं होतं, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करुन मी दिल्लीच्या राजकारणात जातो असं म्हटलं होतं, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (devendra Fadnavis said that he prepares Aditya Thackeray for CM and go to Delhi Big claim of Uddhav Thackeray)

२०१२ मध्ये नरेंद्र मोदी आमच्या घरी आले होते. २०१४ मध्ये ते पंतप्रधान झाले. आम्हाला स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. पण, पुढे त्यांनी आपलं वर्तन बदललं. माझ्या वडिलांच्या निधनानंतर अमित शहांना वाटलं की ते आता शिवसेनेवर घाव घालू शकतात. वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची गॅरंटी आहे. २०१९ मध्ये त्यांनी माझ्यासोबत तेच केलं असं ठाकरे म्हणाले.

मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन. अमित शहा यांच्यासोबत ठरलं होतं की भाजप आणि शिवसेनेमध्ये अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असेल. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ते माझ्या मुलाला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील. तसेच मी दिल्लीच्या राजकारणात जाणार आहे असंही ते म्हणाले होते. त्यांनी माझ्या लोकांसमोर मला खोटं ठरवलं, असं ठाकरे म्हणाले आहेत.

भाजपसोबत असलेला एकही घटकपक्ष खूश नाही. सगळे तुटके-फुटके लोक भाजपसोबत आहेत. आपल्या नेत्यासोबत देखील ते असंच करतात. भाजप हा व्यॅक्युम क्लिनर आहे. त्यांच्याकडे गेल्यास भ्रष्टाचाराचा आरोप असलेले लोक स्वच्छ होतात. प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, अजित पवार यांना भाजपकडून क्लिनचिट मिळाली आहे, असं म्हणत ठाकरेंनी टीका केली.

आमचं हिंदूत्व त्यांच्या हिंदूत्वापेक्षा पूर्ण वेगळं आहे. आमचं हिंदूत्व 'घर का चुल्हा जलाने वाला है', पण त्याचं हिंदूत्व लोकांचं घरे जाळणारं आहे. आम्ही मुस्लिमांविरोधात नाही, आम्ही फक्त देशद्रोह्यांविरोधात आहोत. आम्ही आमची भूमिका बदलेली नाही, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं. भाजपने अनेकदा आम्हाला फसवलं आहे. त्यामुळे परत त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच नाही, असंही ते म्हणाले. (Maharashtra Politics)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT