Devendra Fadnavis Slam Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : 'उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय, गेट वेल सून...'; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Slam Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित कणसे

Latest Marathi Political News : राज्यात मागील काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर राज्य सरकारवर कडाडून टीका केल्याचे पाहायला मिळाले . दरम्यान या टीकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे.

राज्यात ज्या घटना घडल्या त्या व्यक्तीगत वैमनस्यातून घडल्या आहेत. त्या घटना गंभीर आहेत, त्यांचं गांभीरता मी नाकारत नाही. पण व्यक्तीगत वैमनस्यातून या घटना घडल्याने याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था आणि राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणे अयोग्य आहे. ज्या दोन तीन घटना आहेत त्यापाठीमागे वयक्तीक कारणे हेवेदावे आहेत. त्यांची भांडणे, व्यवहार आहेत. त्याबाबत आम्ही कडक कारवाई करत आहोत असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात एका पक्षाच्या महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात असून याची निष्पक्ष चौकशी केली जावी अशी मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, विजय वडेट्टीवारांना फार काही माहिती नसतं, ते अशा सनसनाटी गोष्टी बोलत असतता. कुठल्याही गोष्टीची योग्य प्रकारे होईलच. पण अलिकडच्या काळात गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत त्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यात खूनखराबे वाढतील, राज्या मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर बोलताना फडणवीस हसून म्हणाले की, त्यांची भाषा आणि त्यांचे शब्द पाहता माझं ठाम मत झालं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी एवढंच म्हणेल की गेट वेल सून. मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही आणि एवढंच म्हणेल की गेट वेल सून (लवकर बरे व्हा) असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT