Devendra Fadnvis esakal
महाराष्ट्र बातम्या

अर्थसंकल्पावर फडणवीस म्हणाले, राज्य सरकारला मद्यात जास्त रस...

सरकारंन मांडलेला अर्थसंकल्प आणि दिसणारा अर्थसंकल्प पूर्णपणे वेगळा आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) टीका करण्यास सुरुवात केली आहे. आज विधीमंडळात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी अर्थसंकल्पातील घोषणा, तरतूदी, माहिती याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त करत टीकास्त्र सोडले. राज्य सरकारमध्ये ज्याची ताकद जास्त त्याला जास्त मदत दिली जाते अशी अवस्था आहे. सरकारने मांडलेला अर्थसंकल्प आणि दिसणारा अर्थसंकल्प पूर्णपणे वेगळा आहे. अजितदादांनी डंके की चोट पे सर्व निधी राष्ट्रवादीला (NCP) म्हणजे राष्ट्रवादीलाच दिला अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली.

महाविकास आघाडीवर टीका करताना फडणवीस म्हणाले, चालु योजनाच यंदाच्या अर्थसंकल्पात पुन्हा सांगण्यात आल्या आहेत. राज्य सरकारला मद्यात जास्त रस असल्याने फक्त जुन्या बाटलीत मद्य टाकण्याचे काम केले आहे. राज्याची प्रगती दाखवताना केंद्राचा आधार घेतला आहे.

राज्य सरकारमध्ये ज्याची ताकद जास्त त्याला जास्त मदत दिली जाते अशी अवस्था आहे.

बैलगाडी शर्यतीसाठी तुम्ही श्रेय घेतले. २०१४ ला न्यायालयाने बंदी घातली होती. आम्ही केंद्र सरकाकडे शिस्त मंडळ घेऊन गेलो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी गॅजेट काढल आणि शर्यत पु्न्हा सुरु झाली. न्यायालयाने पुन्हा बंदी घातली. २०१७ साली आम्ही नवीन कायदा करून शर्यत पुन्हा सुरु केली. त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्यानंतर (रनिंग अॅबेलिटी आॅफ बुल) बैल हा धावणारा प्राणी आहे असा अहवाल तयार केला. न्यायालयाने तो स्विकारला आणि त्याच्या आधारावर ही परवानगी दिली आहे. जरी तुमच्या काळात ही मान्यता मिळाली असली तरी याचे श्रेय फक्त तुम्ही घेऊ नका आम्हालाही द्या असा शालजोडा त्यांनी हाणला.

अर्थसंकल्पात निधीच्या केलेल्या घोषणेवर फडणवीस म्हणाले, आर्थिक वर्ष संपल तरीही अनेक विभागांनी ५० टक्केही निधी खर्च केला नाही. एकूण बजेटच्या २५ टक्के खर्च हा एका दिवसात झालेला आहे. सरकारने मांडलेला अर्थसंकल्प आणि दिसणारा अर्थसंकल्प पूर्णपणे वेगळा आहे. कोणतीही वेगळी योजना नाही. उलट सावकारी कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात कोणत्याही विभागात आर्थिक शिस्त दिसत नाही असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलचे पहिले कसोटी शतक! रवींद्र जडेजासह मिळून वेस्ट इंडिजचा 'गेम' केला, रिषभची वाढवली धडधड

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

"मुंज्या सिनेमा मराठीत बनणार होता पण.." दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा ; म्हणाला...

Heavy Rain Damages Mosambi: कन्नड तालुक्यात मोसंबी बागांना अतिवृष्टीचा फटका; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Heavy Rain: लाखाोंचे मासे गिरिजा नदीत गेले वाहून; फुलंब्रीतील मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक संस्था संकटात

SCROLL FOR NEXT