Whatsapp
Whatsapp 
महाराष्ट्र

अखेर धनंजय मुंडेंच्या 'पीआरओ'चे व्हॉट्सऍप सुरु 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपले जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सऍप बॅन केल्याबद्दल आवाज उठविताच आज (गुरुवार) पुन्हा एकदा त्यांचे व्हॉट्सऍप सुरु झाले आहे.

प्रशांत जोशी यांनी ट्विट करून व्हॉट्सऍप पुन्हा सुरु झाल्याचे म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी बुधवारी जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सऍप अचानक बंद करण्यात आल्याचा आरोप केला होता. प्रशांत जोशी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून बातम्या आणि माझ्या राजकीय बैठका तसंच बातम्या शेअर करण्यासाठी वापरतात, त्यामुळे बंद करण्यात आल्याचे म्हटले होते. 

प्रशांत जोशी यांनी आज ट्विट करत म्हटले आहे, की सर्वांच्या सहकार्यामुळे आणि माध्यमांच्या दबावामुळे अखेर व्हॉट्सऍपला झुकावे लागले असून, माझे बंद केलेले व्हॉट्सऍप पुन्हा सुरु झाले आहे. डीजिटल आणीबाणीच्या विरोधातील लढ्यास साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT