Bageshwar Baba Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ''मराठ्यांचं शौर्य मोठं.. त्यांना आरक्षण दिलं पाहिजे'' बागेश्वर बाबांनी दिलं समर्थन

मराठा आरक्षण: बागेश्वर बाबांनी दिलं समर्थन, ओबीसी नेत्यांनी केलं विरोध

संतोष कानडे

मुंबईः राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना आणि ओबीसी नेत्यांनी एकजूट दाखवून लढा उभारण्याचा इशारा दिलेला असताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे.

पत्रकारांशी बोलताना धीरेंद्र शास्त्र यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे.

धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, मनातलं ओळखणं वेगळं असतं आणि अधिकारांवर बोलणं वेगळं असतं. भारत जेव्हा गुलामीत होता तेव्हा मराठ्यांना शौर्य दाखवून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यामुळे बागेश्वर पीठ मराठा समाजाबांधवांच्या सोबत आहे. त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे.

एकीकडे बागेश्वर बाबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलेलं आहे तर दुसरीकडे राज्यातील ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय. छगन भुजबळ सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला.

दरम्यान, मंगळवारी राज्यातील ओबीसी नेत्यांची एक बैठक छगन भुजबळांनी बोलावली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचं म्हटलं आहे.

प्रकाश शेंडगे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागास नसल्याचं सिद्ध केलं आहे. तरीही राज्य सरकारने मराठा समाजाला मागास ठरवून ओबीसी आरक्षण देत आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु आता ओबीसींच्या आरक्षणावर गंडांतर येत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, अशी भूमिका शेंडगेंनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT