Chandrakant Patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Pati: भाजपचे नेते भीक मागून आमदार खासदार झाले का? राष्ट्रवादीचा सवाल

भाजपच्या नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधान केली जात आहेत

रुपेश नामदास

Chandrakant Pati: भाजपच्या नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधान केली जात आहेत. त्यामुळं राजकीय वाद पेटलेला असताना त्यात आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं ते आता टीकेचे धनी झाले आहेत. त्यांच्या विरोधात राज्यभर निदर्शने करण्यात आली.

आज राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटील हाय हाय म्हणत पुण्यात आंदोलन केले आहे. पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणाबाजी केली. तर पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत जहरी टीका केली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "अहो चंद्रकांत पाटील कर्मवीर भाऊराव पाटील, फुले,आंबेडकर या महापुरुषांनी बहुजनांच्या, जनतेच्या उद्धारासाठी भिक नव्हे तर देणगी मागितली हे लक्षात घ्या पण भाजपचे नेते मात्र भीक मागून आमदार खासदार झाले का? असं लिहित भाजपचा आणि चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

पैठण इथं एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हतं. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात.

शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलेलं नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.

पाटील पुढे म्हणाले, ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT