Raigad Fort Mahad esakal
महाराष्ट्र बातम्या

तुमचे पदवीपर्यंत शिक्षण झालयं का? विद्यार्थ्यांना पुरातत्त्वशास्त्रातून करिअर व नोकरीच्या खूप संधी; जाणून घ्या, प्रवेश प्रक्रिया व नोकरीची संधी

कला, वाणिज्य, विज्ञान अशा कोणत्याही विषयातून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पुरातत्त्वशास्त्रामधून करिअर व नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटन, वस्तूसंग्रहालय, सांस्कृतिक, मुर्तीकार, मंदिर स्थापत्य अशा विविध क्षेत्रात या विद्यार्थ्यांना शासकीय, खासगी क्षेत्रात नोकरी आणि करिअर करण्याच्या खूप मोठ्या संधी आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : कला, वाणिज्य, विज्ञान अशा कोणत्याही विषयातून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पुरातत्त्वशास्त्रामधून करिअर व नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी प्रतीक्षा यादी लागते. पर्यटन, वस्तूसंग्रहालय, सांस्कृतिक, मुर्तीकार, मंदिर स्थापत्य अशा विविध क्षेत्रात या विद्यार्थ्यांना शासकीय, खासगी क्षेत्रात नोकरी आणि करिअर करण्याच्या खूप मोठ्या संधी आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभागाकडून प्राचीन इतिहास, भारतीय पुरातत्व, जागतिक पुरातत्व, अश्मयुगीन कालखंड, मुर्तीशास्त्र, मंदिर स्थापत्य, नाणकशास्त्र, शिलालेखशास्त्र, धर्म व तत्त्वज्ञान, उत्खनन प्रकल्प, सर्व्हेक्षण प्रकल्प, डिजिटल आर्किलॉजी (जीपीएस, जीएआयएस, फोटो जॉमेट्री, ड्रोनमधून एरियल फोटोग्राफी, थ्रिडी इमेज प्रोसेसिंग), फोटोग्राफी या विषयांवर शिक्षण दिले जाते. विद्यापीठात हा अभ्यासक्रम दोन वर्षांसाठीचा आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्वशास्त्र विभाग, राज्य पुरातत्त्वशास्त्र विभाग, पर्यटन, या ठिकाणी पुरातत्व तज्ज्ञ म्हणून विद्यार्थ्यांना संधी मिळते. याशिवाय विविध ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात अभीरक्षक म्हणून, प्राचीन लिपी वाचण्यासाठी लिपीतज्ज्ञ म्हणूनही संधी आहेत. तसेच किल्ले संवर्धनातही चांगली संधी आणि पुराभिलेखागार (संशोधक) म्हणूनही अनेक नोकऱ्या आहेत.

अशा आहेत करिअर व नोकरीच्या संधी

  • स्वतःचा पर्यटन उद्योग सुरू करता येतो

  • सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन करता येते

  • मंदिर, मुर्ती, लेणी यांचे मॉडेलिंग (प्रतिकृती) करून उद्योजक होण्याची संधी

  • इतिहास व पुरातत्त्वाचे हेरिटेज रिपोर्टर म्हणून संधी

  • ब्लॉगर, पुरातत्त्व व इतिहासात काम करताना पुस्तक लेखक बनता येईल

व्यवसाय- उद्योगातील संधी

  • वस्तुसंग्रहालय निर्माण करण्याची एजन्सी काढता येईल

  • हेरिटेज वास्तूंसंबंधीचा कायदेविषयक सल्लागार म्हणून संधी

  • शासनाच्या विविध योजनांचा तज्ज्ञ अभ्यासक म्हणूनही संधी

  • वारसा संवर्धन अधिकारी, मूर्ती शास्त्रज्ञ व वक्ता, प्रशिक्षक म्हणूनही संधी

  • ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वास्तू व वस्तूंचे संरक्षक व संवर्धन व कालगणना तज्ज्ञ

करिअर व नोकरीच्या खूप संधी

ऐतिहासिक संशोधन, अभ्यास, पर्यटन, मंदिर, लेणी, मूर्ती, स्थापत्य अशा क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक जॉब व करिअरची संधी आहेत. पुरातत्त्वशास्त्रातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार राहात नाहीत, अशी खात्री आहे.

- डॉ. प्रभाकर कोळेकर, विभागप्रमुख, पुरातत्वशास्त्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT