महाराष्ट्र बातम्या

शिर्डी संस्थान ‘राष्ट्रवादी’कडे, पंढरपूर काँग्रेसला?

सकाळ वत्तसेवा

मुंबई - महाविकास आघाडीच्या नेत्यांची महामंडळ वाटपासंदर्भातील बैठक बरोबर वर्षभरानंतर पुन्हा एकदा पार पडली आणि पुन्हा एकदा १५ दिवसांत महामंडळ वाटप केले जाणार असल्याचे आश्वासन आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. यात शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात जाण्यावर सहमती झाल्याचे समजते. सिडको काँग्रेसकडे, ‘म्हाडा’ शिवसेनेकडे आणि महिला आयोग ‘राष्ट्रवादी’ला देण्यावरही सहमती झाल्याचे समजते.

सर्व महामंडळांचे वाटप सहमतीने झालेले असून त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री येत्या १५ दिवसांत घेतील, असे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या बैठकीनंतर सांगितले. सह्याद्री अतिथिगृहात आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. सत्तेत असूनही मंत्रिपदापासून वंचित राहणाऱ्यांना शांत करण्यासाठी महामंडळाचे मधाचे बोट लावले जाते. यावेळी मात्र महाविकास आघाडीतील असंतुष्टांसाठी भाजप गळ टाकून बसलेली असल्याने त्यांच्या मनधरणीसाठी त्यांची वर्णी महामंडळांवर लावण्याबाबत शिवसेना गंभीर आहे.

महाविकास आघाडीत डावलले जात असल्याची भावना काँग्रेसची असल्याने आणि मंत्रिपदात त्यांना वाटाही अल्प मिळाल्याने महामंडळांचे वाटप लवकरात लवकर व्हावे, असा काँग्रेसचाही महाविकास आघाडीवर दबाव आहे. बैठकीला अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

काँग्रेसमध्ये नाराज

मंत्रिपद आणि सदस्य संख्येच्या आधारे महामंडळ वाटप केले जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर महामंडळाचे वाटप तिन्ही पक्षात समसमान होईल, असा दावा नाना पटोले यांनी केल्याने महामंडळाच्या वाटपावरून काँग्रेस नाराज असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा; लालबागचा राजा, परळ आणि गिरगाव चौपाटी परिसरात चोरीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT