ajit pawar ajit pawar
महाराष्ट्र बातम्या

'राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर राज्यपालांशी लवकरच चर्चा'

राज्यपालांनी विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या विषयावर चर्चेसाठी बोलावले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे.

प्रमोद सरवळे

राज्यपालांनी विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या विषयावर चर्चेसाठी बोलावले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे.

पुणे: पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपालांना भेटणार आहेत. या चर्चेत ते मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा प्रश्न म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. राज्यपालांनी विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या विषयावर चर्चेसाठी बोलावले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे.

अखेर १२ आमदारांच्या नियक्तीचा तिढा सुटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. आता या विषयावर राज्य सरकारमधील नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींशी चर्चा करणार आहेत. पुढच्या आठवड्यात राज्यपालांची वेळ घेऊन प्रलंबित असणाऱ्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

नेमका वाद काय आहे?

विधानपरिषदेत राज्यपाल विषेश अधिकार वापरून १२ आमदारांच्या नियुक्ती करत असतात. पण यासाठी राज्य सरकारचा त्यासाठी नावांसह प्रस्ताव आला पाहिजे. त्या मुद्द्यावरूनच राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद सूरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT