Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra Modi sakal
महाराष्ट्र

भाजप नेत्यांचा ‘भेटी’वरून भ्रमनिरास

संजय मिस्कीन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी दिल्लीत झालेल्या भेटीवरून राज्यात राजकीय गदारोळ उडाला. भाजपच्या नेत्यांनी या भेटीबाबत संशयकल्लोळ तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पवार यांनी पत्रकार परिषद घेत भेटीचा सविस्तर वृत्तांत कथन केल्याने भाजप नेत्यांचा भ्रमनिरास झाल्याचे चित्र होते. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत राजकीय संशय निर्माण करताना भाजप नेत्यांनी या भेटीला राज्यातील सत्तासमीकरण आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा सुरू असलेला ससेमिरा या भोवती

गुंफण्याचा प्रयत्न केला. प्रवीण दरेकर यांनी ही भेट म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणाची सुरू असलेल्या कारवाईबाबत समझोत्याची भेट असू शकते, असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘राष्ट्रवादी’लाच भाजप सोबत यायचे असल्याचे सूतोवाच करत या भेटीबाबत संशयाचे वातावरण गडद करण्याचा प्रयत्न केला.

शरद पवार यांनी भाजप नेत्यांचे दावे - प्रतिदावे झुगारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजपच्या विरोधात उभी आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. पुढील निवडणुकांतही आघाडी कायम राहणार असून सत्ता मिळवू, असा इशारा भाजपला दिला. मुनगंटीवार यांच्या दाव्याचीही खिल्ली उडविली.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याअगोदर अशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली होती. त्यावरूनही जोरदार राजकीय संशयकल्लोळ निर्माण केला होता. मात्र पवार यांनी राज्यात भाजप विरहित सत्ता स्थापन करून भाजपला धोबीपछाड दिला. आजच्या भेटीनंतरही अशाच प्रकारचा संशयकल्लोळ निर्माण होत असताना पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा करत पुन्हा एकदा भाजपला तोंडघशी पाडल्याची राजकीय चर्चा रंगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT