महाराष्ट्र

"प्राप्तिकर'च्या हेल्पलाइनवर घटस्फोटाचे भांडण! 

अनिश पाटील

मुंबई - "आमचा घटस्फोट होत असून, जास्त पोटगी द्यायची नसल्यामुळे पती उत्पन्न लपवत आहे', "माझ्या प्राप्तिकराचा परतावा आतापर्यंत आलेला नाही, काय करू', अशा दूरध्वनींमुळे प्राप्तिकर विभागाची हेल्पलाइन व्यग्र आहे. विशेष म्हणजे, ही हेल्पलाइन निवडणुकीच्या काळात काळ्या पैशांच्या व्यवहारावर नजर ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या हेल्पलाइनवर सुमारे 400 दूरध्वनी आले. काळ्या पैशांविरोधात एखादी कारवाई करण्यास मदत होईल, असा एकही दूरध्वनी आलेला नाही, असे प्राप्तिकर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मागील 

लोकसभा निवडणुकीदरम्यान प्राप्तिकर विभागाच्या हेल्पलाइनवर सुमारे 125 दूरध्वनी आले होते. या वेळी प्राप्तिकर विभागाने अधिकाधिक नागरिकांपर्यंत या हेल्पलाइनची माहिती पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, माध्यमांमधून जाहिरातीही दिल्या. परिणामी हेल्पलाइनवर आलेल्या दूरध्वनींमध्ये जवळपास चारपट वाढ झाली; मात्र कारवाई करता येईल, असा एकही दूरध्वनी नव्हता, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

"घटस्फोटानंतर जास्त पोटगी द्यावी लागेल, म्हणून माझ्या पतीने कमी उत्पन्न दाखवले आहे. त्याचे खरे उत्पन्न जास्त आहे. मी तुम्हाला सगळी माहिती देते', "मी प्राप्तिकर परताव्यासाठी अर्ज केला होता; परतावा कधी मिळेल?', असे गमतीदार दूरध्वनी या हेल्पलाइनवर येत आहेत. हे दूरध्वनी टाळता येत नसल्यामुळे कर्मचारी मार्गदर्शन करत आहेत. तुम्ही अमुक ठिकाणी तक्रार करा, तमुक ठिकाणी अर्ज करा. ही हेल्पलाइन या कामासाठी नाही, असे सांगितले जात आहे. प्राप्तिकर परताव्यासाठी चौकशी, पती-पत्नीमधील भांडण, घटस्फोटातील पोटगी याबाबतच्या दूरध्वनींची संख्या सर्वाधिक आहे. वैमनस्यातून एखाद्याला त्रास देण्यासाठी येणाऱ्या दूरध्वनींची संख्याही बऱ्यापैकी असल्याचे समजते. 

प्रतिक्रिया  
या निवडणुकीदरम्यान हेल्पलाइनवर येणाऱ्या दूरध्वनींमध्ये चौपट वाढ झाली आहे. 2014 मध्ये सुमारे 100 दूरध्वनी आले होते; ती संख्या आतापर्यंत 400 वर गेली आहे. 
- संतोष माणकोसकर, अतिरिक्त संचालक (अन्वेषण), प्राप्तिकर विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT