Express
Express sakal media
महाराष्ट्र

कोकण-विदर्भासाठी उत्सव विशेष एक्स्प्रेस

कुलदीप घायवट

मुंबई : दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी (Diwali Festival) होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी (Commuters crowd) लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (central railway) नागपूर आणि करमळी, पुणे आणि भगत की कोठी या स्थानकांदरम्यान विशेष उत्सव रेल्वे (special Festival express) चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०१२३९ विशेष उत्सव ट्रेन ३० ऑक्टोबरपासून ते २० नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी नागपूर येथून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता करमळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२४० विशेष उत्सव ट्रेन ३१ ऑक्टोबरपासून ते २१ नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी करमळी येथून रात्री ८.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी येथे थांबा असेल.

गाडी क्रमांक ०१२४७ विशेष अतिजलद ट्रेन २९ ऑक्टोबरपासून ते १९ नोव्हेंबरपर्यंत सीएसएमटी येथून दर शुक्रवारी रात्री १०.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२४८ विशेष अतिजलद ट्रेन ३० ऑक्टोबरपासून ते २० नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी नागपूर येथून सायंकाळी ५.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी (फक्त गाडी क्रमांक ०१२४८ साठी), नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा असेल.

गाडी क्रमांक ०१२४९ विशेष ट्रेन २२ ऑक्टोबरपासून ते १९ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून रात्री ८.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.५५ वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२५० साप्ताहिक विशेष ट्रेन २३ ऑक्टोबरपासून ते २० नोव्हेंबरपर्यंत भगत की कोठी येथून रात्री १०.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.०५ वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, भिल्डी, धानेरा, राणीवाडा, मारवाड, भीनमल, मोडरान, जालोर, मोकलसर, समाधारी आणि लुनी येथे थांबेल. पूर्णतः आरक्षित विशेष ट्रेन क्रमांक ०१२३९, ०१२४७, ०१२४८ आणि ०१२४९ साठीचे विशेष शुल्कासह बुकिंग १८ ऑक्टोबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

GT vs KKR Live Score IPL 2024 : पावसाचा जोर कामय, गुजरात - केकेआर सामन्यावर संकट

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT