school SAKAL
महाराष्ट्र बातम्या

माध्यमिक शाळांना गुरूवारपासून ८ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुटी! ‘प्राथमिक’ ७ नोव्हेंबरला उघडणार

शासनाच्या निर्णयानुसार शाळांना दरवर्षी ७६ दिवस सुट्ट्या दिल्या जातात. दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यांचाही त्यात समावेश असतो. त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग त्यांच्या सोयीनुसार काही सुट्ट्या मागे-पुढे करतात.

तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळीची सुरवात २१ ऑक्टोबरला ‘वसुबारस’ने होणार आहे. गुरुवारी (ता. २०) प्राथमिक व माध्यमिक शाळांची सत्र परीक्षा संपणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून प्राथमिक व माध्यमिक शाळांना दिवाळी सुटी असेल. पण, दोन्ही शाळांच्या सुट्ट्यांचे दिवस कमी-अधिक असणार आहेत.

शासनाच्या निर्णयानुसार शाळांना दरवर्षी ७६ दिवस सुट्ट्या दिल्या जातात. दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यांचाही त्यात समावेश असतो. त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग त्यांच्या सोयीनुसार काही सुट्ट्या मागे-पुढे करतात. आता दिवाळीनिमित्ताने माध्यमिक शाळांना २१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता ७ नोव्हेंबरला दिवाळी सुटी संपेल, पण ८ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असल्याने त्या दिवशी शाळा बंदच राहणार आहेत. दुसरीकडे प्राथमिक (जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक) शाळांना २१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुटी असणार आहे. पण, ६ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने शाळा ७ नोव्हेंबरला (सोमवारी) सुरु होईल. त्यानंतर मंगळवारी (ता. ८) गुरुनानक जयंतीची सुट्टी असेल. दिवाळी सुट्ट्यांवरून माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे एकूणच माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी एकसारखा नाही, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शाळांमध्ये आता ‘लेझिम अन्‌ गीतमंच’ उपक्रम

प्राथमिक शाळांमधील मुलांना शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषय देखील आहेत. पण, त्यासंदर्भात काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे आता प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी त्या विषयांअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्यासाठी विविध उपक्रम घेण्याचा आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तसा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर जवळपास १५० ते २०० शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शाळांमधील मुलांचे लेझिम, गीतमंचअंतर्गत समुहगित, देशभक्तीपर गीते, कविता असे उपक्रम होतील. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ग्रामीण भागातील चिमुकली तयार व्हावीत म्हणून त्यांना देखील शिक्षक विशेष वेळ देऊन अध्यापन करतील, असे ते नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT