Cancer esakal
महाराष्ट्र बातम्या

स्तन, तोंड अन्‌ गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे माहिती आहेत का? जनआरोग्य योजनेतून कर्करोग रुग्णांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

कर्करोग तपासणीसाठी एक व्हॅन १३ एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यात येणार आहे. तत्पूर्वी, शहर-जिल्ह्यातील ३० वर्षांवरील प्रत्येकाची प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे व केंद्रांवर कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे. तपासणी मोहीम उद्यापासून (ता. १०) सुरू होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कर्करोग तपासणीसाठी आठ व्हॅन दिल्या आहेत. त्यातील एक व्हॅन १३ एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यात येणार आहे. तत्पूर्वी, शहर-जिल्ह्यातील ३० वर्षांवरील प्रत्येकाची प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे व केंद्रांवर कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे. तपासणी मोहीम उद्यापासून (ता. १०) सुरू होणार आहे.

तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती असून दुसरीकडे जीवनशैलीत देखील मोठा बदल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने महिला व तरुणांमधील कर्करोग शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासंदर्भात सर्व आशासेविकांचे प्रशिक्षण देखील झाले असून आरोग्य उपकेंद्र, केंद्रांवर तपासणी करताना संशयित आढळलेल्या रुग्णाची नोंद करून त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयात पाठविले जाईल. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट रुग्णालयांमध्येही त्यांना तीन ते पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

दरम्यान, आरोग्य विभागाची व्हॅन सोलापूर जिल्ह्यात आल्यावर गावोगावी दवंडी देऊनही कर्करुग्णांची तपासणी केली जाणार आहे. तत्पूर्वी, शासकीय रुग्णालयात येणाऱ्या ३० वर्षांवरील प्रत्येक रुग्णांची कर्करोगाच्या अनुषंगाने तपासणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

कर्करोगाची लक्षणे....

१) मुखाचा कर्करोग

  • दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी तोंड येणे

  • तोंडात लाल किंवा पांढरा चट्टा असणे

  • तोंड उघडायला त्रास होतो

  • ---------------------------------------------------------------------

२) स्तनाचा कर्करोग

  • स्तनात गाठ येते

  • स्तनाच्या आकारात वाढ होते

  • स्तनातून पू किंवा सतत रक्तस्राव होतो

  • ------------------------------------------------------------------------

३) गर्भाशयाचा कर्करोग

  • मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्राव

  • मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावरही रक्तस्राव होतो

  • शारीरिक संबंधानंतर रक्तस्राव, दुर्गंधीयुक्त स्त्राव होतो

जिल्हा रुग्णालयात लवकरच ‘डे केअर’ची सोय

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोग लवकर समजत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे त्यांचे लवकर निदान होऊन तो रुग्ण बरा व्हावा, यासाठी संशयितांची तपासणी सुरू होणार आहे. त्या रुग्णांना ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचार मिळतील. दुसरीकडे कर्करुग्णावरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयासाठी शासनाकडून केमोथेरपी सेंटर (डे केअर) मंजूर झाले असून आगामी काळात रुग्णांसाठी ही सुविधा सुरू होईल.

- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ट्रम्प सोडा आता केजरीवालांना सुद्धा हवा नोबेल पुरस्कार! गाजणारा दावा सोशल मीडियावर चर्चेत

Viral: नेत्यानंतर सामान्य जनताही 'डान्सिंग कार' मध्ये! कॉलेजसमोर गाडीत जोडपं आक्षेपार्ह अवस्थेत दिसलं, व्हिडिओ व्हायरल

Video : आज्जी बाई मोडकळीस आलेल्या पूलावरून निघाल्या, पण बघताना प्राण आले कंठाशी! तेवढ्यात....; पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ

Thane News: सरकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल; काय आहेत मागण्या?

Nashik Crime : आरोग्य खात्यात नोकरीचं आमिष, ९० जणांची दीड कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT