temperature increase sakal
महाराष्ट्र बातम्या

उन्हाळी लागल्यावर उपाय काय माहितीयं का? चिंता करू नका, घरच्या घरी ‘हे’ उपाय करा, नक्की काही वेळातच कमी होईल दाहकता

आयुर्वेदात उन्हाळी लागल्यावर नेमके काय करावे, यासंबंधी नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. तरीदेखील खूपच त्रास होत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दवाखान्यातून उपचार घेणे चांगले, असे तज्ज्ञ सांगतात.

तात्या लांडगे

सोलापूर : उन्हाळा अर्थातच ग्रीष्म ऋतू स्वतःच्या सर्व शक्तीने तळपणारा सूर्य आपल्या उष्ण तीक्ष्ण किरणांनी सृष्टीतील सर्व घटकातील स्निग्धांशाचे, सारभागाचे, सारयुक्त जलीय अंशाचे अधिक प्रमाणात शोषण करतो. त्यामुळे रसाप्क्षय (शक्ती कमी) व शरीरात वात दोषांची वृद्धी होते. हा थकवा भरून काढण्यासाठी आयुर्वेदात विविध खाण्डव, पानक, सार, सिद्ध जलाचा प्रयोग करावा असे सांगितले जाते.

सोलापूरचे तापमान सध्या ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. अनेकांना उन्हाचा त्रास होतो तर काहींना उन्हाळीचा त्रास जाणवतो. अशावेळी आयुर्वेदात रामबाण उपाय सांगितले आहेत. तरीपण, जेव्हा कडक उन्ह असते त्यावेळी शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना डोक्यावर, डोळ्यावर व अंगात सुती कपडे जरुरी आहेत. आयुर्वेदात उन्हाळी लागल्यावर नेमके काय करावे, यासंबंधी नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. तरीदेखील खूपच त्रास होत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दवाखान्यातून उपचार घेणे चांगले, असे तज्ज्ञ सांगतात.

उन्हाळ्यात पाणी किती प्यावे?

तहान लागली की पाणी प्यावे, त्यासाठी शरीराचे घड्याळ समजून घ्यावे. उगाचच अमूकवेळी इतके पाणी प्यावे असे काही ठरवू नये. तहान लागली की तहान भागेपर्यंत पाणी प्यावे हे शास्त्रसंयुक्त व तब्येतीसाठीही योग्य आहे. उन्हातून आल्यानंतर फ्रीजमधील बाटली काढून बाटलीनेच वरून पाणी पिणे शरीराला त्रासदायक असते. उन्हातून आल्यानंतर थोडावेळ बसा आणि नंतर ग्लासमधे ओतून पाणी प्यावे. खूप थंड, बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये. माठातील पाणी अगदी उत्तम. त्यातही वाळा टाकलेले अधिक उत्तम मानले जाते.

उन्हाळी लागल्यास काय करावे?

लघुशंका करताना दाह होत असल्यास धने, खडीसाखर, तुळशीचे बी घालून पाणी प्यावे. शरीरातून बाहेर पडणाऱ्या मूत्राचे स्वरूप व प्रमाण, यावरून पाणी योग्य प्रमाणात पिले की नाही हे समजते. मूत्र प्रवृत्ती योग्य प्रमाणात व काहीही त्रास न होता होत असल्यास पाण्याचे प्रमाण बरोबर आहे असे समजावे. उन्हाळे लागली असल्यास रात्री झोपताना मातीच्या मटक्यात खडीसाखर, धने व सब्जा बी (तुळशीच्या बिया) पाण्यात भिजत घालावे व सकाळी कुस्करून गाळून प्यावे. उन्हामध्ये अधिक फिरणे झाल्यामुळे डोळ्यांची जळजळ होत असल्यास डोळ्यांवर दुधाच्या किंवा गुलाब जलाच्या पट्ट्या ठेवाव्यात. तसेच उन्हातून आल्यावर ताबडतोब डोळे थंड पाण्याने धुवून न घेता थोड्या वेळाने धुवावेत.

चंदन उगाळलेले पाणी, सेंद्रिय गूळ, गुलकंद देखील उत्तम उपाय

गुलकंद किंवा सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गूळ खालल्यास देखील उन्हाळी कमी होवू शकते. तसेच जास्त प्रमाणात उन्हाळीचा त्रास होत असल्यास चंदन उगाळून त्याचे पाणी पिल्यास उन्हाळीची तीव्रता कमी होते.

- डॉ. गायत्री देशपांडे, आयुर्वेदतज्ज्ञ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bridge Collapsed In Gujarat : गुजरातमध्ये पुलाचे अचानक दोन तुकडेअनेक वाहनांना जलसमाधी; तिघांचा मृत्यू, टॅंकर लटकला अन्...

युझवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड RJ Mahvash बनली क्रिकेट संघाची मालकीण; फिरकीपटूने लगेच केलं Like

Sangli Politics : विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यात गुपीत बैठक, जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशाने राजकीय समिकरणे बदलणार

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी दोन गेमचेंजर फीचर्स एंट्री; डीपी प्रेमींसाठी खूपच फायद्याचं, इथे पाहा एका क्लिकवर..

अभिनेत्रीनं घरभाडं थकवलं, कोर्टाच्या आदेशावरून फ्लॅट रिकामा करायला गेले पोलीस; सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT