Samosa Esakal
महाराष्ट्र बातम्या

Online Fraud:१ लाख चाळीस हजारांना २५ समोसे! मुंबईतील डॉक्टरने खाल्ला इतका महाग नाष्टा

Online Fraud with Doctor:महाराष्ट्राच्या मुंबईत एका डॉक्टरला ऑनलाईन समोसे मागवणं चांगलंच महागात पडलंय. त्याला चक्क १ लाख ४० हजार रुपयांना भूर्दंड बसलाय.

सकाळ डिजिटल टीम

Online Fraud with Doctor:महाराष्ट्राच्या मुंबईत एका डॉक्टरला ऑनलाईन समोसे मागवणं चांगलंच महागात पडलंय. त्याला चक्क १ लाख ४० हजार रुपयांना भूर्दंड बसलाय. हे प्रकरण मुंबईतील शीव या ठिकाणी घडलंय. केईएम हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या या २७ वर्षीय डॉक्टरने या प्रकरणाविषयी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे.

डॉक्टरच्या सांगितल्यानुसार, त्याने शनिवारी (दि. ८जुलै) सकाळी साडेआठ वाजता समोसे ऑर्डर केले होते. मात्र, २५ प्लेट समोस्याच्या नादात त्याला १.४० लाखाचा भूर्दंड बसेल याची त्याला कल्पनाच नव्हती.

डॉक्टरने सांगितले की तो त्या दिवशी आपल्या मित्रांसोबत कर्जतला जाणार होते. त्यांचा पिकनिकला जाण्याचा प्लॅन होता. त्यामुळे त्यांनी विचार केला की काहीतरी खाण्यासाठी घेऊन जाऊयात. त्यानंतर डॉक्टरने गुरुकृपा हॉटेलमध्ये फोन करुन २५ प्लेट समोस्याची ऑर्डर दिली. त्याला फोनवर १५०० रुपयांचं पेमेंट करायला सांगितलं. (Latest Marathi News)

डॉक्टरने सांगितलेल्या नंबरवर १५०० रुपये पाठवले. त्यावर त्यांना परत फोन आला की पेमेंट मिळालेलं नाही, त्यामुळे तुम्ही दुसऱ्या नंबरवर आमची पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारा आणि त्यावरचं पेमेंट करा. डॉक्टरांना नंतर पेमेंट लिंक पाठवण्यात आली. डॉक्टरने त्या लिंकवर क्लिक करताचं त्याचे २८ हजार कट झाले.

हे पाहून डॉक्टर हैराण झाला कारण, त्याने फक्त १५०० रुपयांचं पेमेंट केलं होतं. त्याला नंतर दोन तीन मेसेज आणखी आले, ज्यावरुन त्याला समजले की त्याच्या अकाऊंटमधून आणखी पैसे कट झाले आहेत. त्याने लगेच आपलं बॅंक अकाऊंट ब्लॉक करुन घेतलं. तोपर्यंत चोरांनी त्याच्या खात्यातून १ लाख ४० हजार रुपये उडवले होते. (Lates Marathi News)

त्यामुळे कोणतंही ऑनलाईन पेमेंट करण्याआधी विचार करा आणि कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून मिळालेल्या लिंकवर क्लिक करु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Latest Marathi News Live Update : अशोक खरातला थोड्या वेळातच कोर्टात हजर करणार

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT