drinking led to a hotels Sakal
महाराष्ट्र बातम्या

ढाब्यांवर मद्यपान करु नका, नाहीतर होईल अटक! ‘एक्साईज’ची 277 ढाबे-हॉटेलवर कारवाई; मद्यपीस 2000 तर ढाबा चालकास 30000 होतो दंड; 2 वर्षांत 10 कोटींची हातभट्टी नष्ट

मद्यपानासाठी एक दिवसीय, एक वर्षासाठी व आजीवन परवाना दिला जातो. परवान्याशिवाय दारू खरेदी व मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई होते. याशिवाय ढाबे-हॉटेलवर मद्यविक्री किंवा मद्यपान करणाऱ्यांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले जाते.

तात्या लांडगे

सोलापूर : मद्यपानासाठी एक दिवसीय, एक वर्षासाठी व आजीवन परवाना दिला जातो. परवान्याशिवाय दारू खरेदी व मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई होते. याशिवाय ढाबे-हॉटेलवर मद्यविक्री किंवा मद्यपान करणाऱ्यांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले जाते. त्याठिकाणी मद्यपीसह एक ते तीन हजारापर्यंत तर ढाबा-हॉटेल चालक किंवा मालकास पाच ते ३० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्या उत्पादन शुल्क विभागाने २०२४-२५ या वर्षात २७७ ढाब्यांवर कारवाई केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात गोवा, कर्नाटकातून विदेशी दारूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. याशिवाय हॉटेल-ढाब्यांवर विशेषत: महामार्गांवरील हॉटेल-ढाब्यांवर बिनधास्तपणे मद्यविक्री होते आणि हजारो वाहन चालक त्याठिकाणी मद्यपान करतात. परमीट रुमशिवाय अन्य ठिकाणच्या मद्यपानास बंदी असून बिअरशॉपी, वाइन शॉपमधूनच मद्यविक्री अपेक्षित आहे. अनेक हॉटेल-ढाबा चालक तेथून दारू आणतात आणि हॉटेलवर जेवायला आलेल्यांची मद्यपानाची सोय करून देतात. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत ‘एक्साईज’ विभागाची ढाब्यांवरील कारवाई २३ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते.

...तर संबंधितांवर दाखल होईल गुन्हा

एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात ढाबे, हॉटेलवर अवैध मद्यपान करणाऱ्या मद्यपींसह परवानगी नसताना मद्य विक्री करणारे हॉटेल-ढाबा मालक, अशा २७७ जणांवर कारवाई केली आहे. त्यांना न्यायालयाने एकूण दहा लाखांहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे. परमीट रुमशिवाय कोणत्याही ठिकाणी विनापरवाना मद्यपान करता येत नाही, तसे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते.

- भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

वर्षात वाढली तीन कोटींची हातभट्टी

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करून २०२४-२५ या वर्षात सुमारे चार कोटींची हातभट्टी दारू, गुळमिश्रित रसायन नष्ट केले आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळात सहा कोटींची हातभट्टी नष्ट केली आहे. २०२३-२४ च्या तुलनेत तब्बल तीन कोटी रुपयांची हातभट्टी अधिक प्रमाणात नष्ट करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील लोक आरोग्यासाठी घातक अवैध हातभट्टीचे सेवन करतात हे यातून स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk ED Inquiry : 'गोकुळमध्ये विश्वास पाटील, अरूण डोंगळेंची ईडी चौकशी होणार', मंत्री मुश्रीफांची अडचण वाढणार; आमदार शिवाजी पाटलांची टीका

Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

Maharashtra Din 2026: महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध?; दहा जागांसाठी दहा अर्ज; महाविकास आघाडीत अखेर एकमत

SCROLL FOR NEXT