Solapur neurosurgeon Dr. Shirish Valsangkar’s suicide case takes a serious turn as police question daughter-in-law Dr. Sonali in ongoing investigation esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! गोळी झाडण्यापूर्वी डॉ. वळसंगकरांचा चौघांना कॉल! आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांच्या मोबाईलवर 27 कॉल; सुसाईड नोटवरील हस्ताक्षर कोणाचे? 2 महिन्यात समजणार

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खिशातील सुसाईड नोटवरून सकृतदर्शनी अटकेतील मनीषा मुसळे माने याच मुख्य आरोपी आहेत. पण, डॉक्टरांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय? याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांच्या मोबाईलवरील कॉलचा ‘सीडीआर’ काढला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खिशातील सुसाईड नोटवरून सकृतदर्शनी अटकेतील मनीषा मुसळे माने याच मुख्य आरोपी आहेत. पण, डॉक्टरांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय?, याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांच्या मोबाईलवरील कॉलचा ‘सीडीआर’ काढला आहे. त्यांच्या मोबाईल ‘सीडीआर’नुसार १८ एप्रिलला डॉक्टरांना आलेले व त्यांनी केलेल्या कॉलची संख्या २७ पर्यंत आहे. रात्री आठनंतर त्यांनी चौघांना कॉल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुलगी नेहा व पत्नी डॉ. उमा त्यावेळी घरीच होते. त्यामुळे डॉक्टरांनी कॉल केलेले किंवा त्यांना कॉल करणारे ते चौघे कोण, याचा तपास पोलिस करीत आहेत.

मनीषा मुसळे माने यांनी डॉ. शिरीष वळसंगकर, त्यांची पत्नी डॉ. उमा व मुलगा डॉ. अश्विन यांना पाठविलेल्या ई-मेलसंदर्भात रुग्णालयातच माफीनामा दिला होता. मनीषाने राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्यावर डॉ. शिरीष यांनीच त्यांना निर्णयापासून थांबविले होते. त्यानंतर घरी गेलेल्या डॉ. शिरीष यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यामागे नेमके कारण काय?, त्यांना त्रास कोणाचा होता?, अशा प्रश्नांची उत्तरे चार्टशिट न्यायालयात पाठविण्यापूर्वी पोलिसांना शोधावीच लागतील. त्यासाठी पोलिसांनी डॉक्टरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर’ मिळविला आहे. त्याची पडताळणी स्वतंत्र अंमलदारामार्फत सुरू आहे. डॉक्टरांकडे दोन मोबाईल होते. एक हॉस्पिटलमधील कामांसाठी तर दुसरा वैयक्तिक कामासाठी मोबाईल होता.

१८ एप्रिलला रुग्णालयातून रात्री आठच्या सुमारास घरी परतलेल्या डॉक्टरांना अटकेतील मनीषाने कॉल केलेला नाही. तसे त्यांनी पोलिस कोठडीत असतानाच तपास अधिकाऱ्यांना सांगितले होते. आता डॉक्टरांनी ज्या दिवशी गोळी झाडून आत्महत्या केली, त्या दिवशी त्यांनी कॉल केलेल्यांसह डॉक्टरांना कॉल करणाऱ्या लोकांना टप्प्याटप्प्याने बोलावून पोलिस चौकशी करतील. त्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळेल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हस्ताक्षर तज्ज्ञांच्या रिपोर्टसाठी लागणार दोन महिने

डॉ. शिरीष यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट पुण्यातील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहे. त्यासोबत डॉ. शिरीष यांची मराठीतील अन्य कागदपत्रे देखील पाठविली आहेत. हस्ताक्षर तज्ज्ञांकडील अहवाल यायला किमान दोन महिने लागतील, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. गुन्ह्याचे चार्टशिट ९० दिवसांत न्यायालयात सादर होईल, तत्पूर्वी हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले.

घटनेपूर्वी डॉक्टरांच्या घरी तिघेच, तरीपण...

स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर अर्धा तास स्वत:च्या बेडरूममध्येच होते. त्यावेळी आदल्या दिवशी त्यांच्याकडे आलेली मुलगी नेहा व पत्नी डॉ. उमा या दोघीच होत्या. त्या हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांच्या घरी तिसरे कोणीच नव्हते, असे डॉ. उमा यांनी पोलिसांना सांगितले. पण, घटनेपूर्वी डॉक्टरांच्या घरी खरोखरच अन्य कोणी नव्हते?, याची खात्री पोलिस डॉक्टरांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजवरून करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi and Xi Jinping meeting : अखेर मोदी अन् जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला! , ट्रम्प ‘टॅरिफ’वरही होणार चर्चा?

E20 पेट्रोल चुकूनही वापरू नका! 'या' कार कंपनीने ग्राहकांना दिला सल्ला, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Cyber Fraud : व्हॉट्सॲपवरील मैत्री पडली महागात; नाशिकमधील विवाहितेला १६ लाखांचा गंडा

Manoj Jarange News: मनोज जरांगे जुन्नरमध्ये दाखल, आंदोलनावर ठाम, अटींचे पालन करण्याचे पोलिसांना हमीपत्र, म्हणाले...

Asia Cup 2025: संजू सॅमसनची सलग 50+ धावांची खेळी, वाढवली शुभमन गिलसह गौतम गंभीरची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT