Dr. Valsangkar Death Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! पोलिसांच्या दोषारोपपत्रात डॉक्टरांचे ना ‘CDR’, ना घटनेच्या दिवशीचे त्यांच्या घरातील, रूग्णालयातील CCTV फुटेज; मनीषाच्या जामिनावर आज सुनावणी

प्रसिद्ध न्यरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी ७२० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. आता आज (ता. २१) अटकेतील मनीषा मुसळे- माने यांच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार असून, न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : प्रसिद्ध न्यरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी ७२० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. पण, घटनेच्या दिवशीचे डॉक्टरांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज, डॉक्टरांच्या मोबाईलचे सीडीआर, १८ एप्रिलचे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर पहिल्यांदा तेथे आलेल्या घराशेजारील दर्बी क्लॉथ सेंटरमधील सुरक्षारक्षकाचा जबाब अशा बाबी दोषारोपपत्रात दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. आता आज (ता. २१) अटकेतील मनीषा मुसळे- माने यांच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार असून, न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येला ६२ दिवस झाले असून, या गुन्ह्यात ६१ दिवसांपासून मनीषा मुसळे अटकेत आहेत. पोलिसांनी तपास करताना ३०० हून अधिक पाने मनीषा यांचे तीन वर्षातील बॅंकांमधील व्यवहार, त्यांनी खरेदी केलेले दागिने याचीच आहेत. याशिवाय रुग्णालयातील कर्मचारी, डॉ. वळसंगकर यांच्या पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब, अशी १०० पाने असल्याची चर्चा आहे. दरम्यान, घटनेदिवशी डॉ. वळसंगकरांनी मुलगा अश्विन यांना फोनवरून व भेटून, आपण मनीषाच्या मानसिक त्रासाला कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्यानंतर डॉ. अश्विन वडिलांच्या घरी आले होते. त्यानंतर डॉ. शिरीष एकटेच त्यांच्या बेडरूममध्ये होते. काहीवेळाने त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. पण, त्या दिवशी डॉक्टरांच्या घरी कोण कोण आले होते, कोण बाहेर गेले होते, त्या दिवशी त्यांनी कोणाकोणाला कॉल केले, डॉक्टरांना कोणाचे कॉल आले, या बाबी पोलिसांच्या तपासानंतरही अनुत्तरीतच राहिल्या आहेत. हाच धागा पकडून मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे युक्तिवाद करतील, अशी शक्यता आहे.

२४ वर्षांनंतर डॉक्टरांनी मराठीत लिहिले...

२००१ साली डॉ. वळसंगकरांच्या रुग्णालयातील रुग्णाच्या तब्येतीबद्दल त्यांनी रुग्णाच्या नातेवाइकास समजावे म्हणून मराठीतून कागद लिहून दिला होता. तत्पूर्वी, त्यांनी मुलगा डॉ. अश्विन यांनाही मराठीतून एक पत्र लिहिले होते. तसेच डॉ. शिरीष यांनी १९८५ साली पत्नी डॉ. उमा वळसंगकर यांना खुशालीबद्दल काही पत्रे मराठीतून पाठविली होती. तीच कागदपत्रे डॉ. शिरीष यांच्या सुसाईड नोटमधील अक्षरे ओळखण्यासाठी पोलिसांनी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविली. पण, हस्ताक्षर तज्ज्ञांनी १३ मे रोजी पोलिसांना पत्र पाठवून डॉक्टरांची दैनंदिन किंवा नजीकच्या काळातील आठ ते दहा कागदपत्रांचे नमुने मागितले. पण, तशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी हस्ताक्षर तज्ज्ञांना कळविले. डॉ. अश्विन यांनीही नजीकच्या काळातील डॉ. शिरीष यांची मराठी हस्ताक्षरातील कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पोलिसांना सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

ISRO: 'इस्रो'कडून होतेय ४० मजली उंचीच्या यानाची निर्मिती; अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली सखोल माहिती

Georai Crime : 'त्या' मायलेकीच्या मृत्यूचे कारण आले समोर; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पतीला अटक

Maharashtra Heavy Rain Update : मुसळधार पावसाचा फटका! जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शाळा- कॉलेज बंद, पण कुठे?

Mumbai Rain Update: मुंबईकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा अंदाज

SCROLL FOR NEXT