फोटो सौजन्य - Live Law 
महाराष्ट्र बातम्या

हायकोर्टाकडून सेशन्स कोर्टाचा निर्णय रद्द, देशमुख पुन्हा ईडीच्या ताब्यात

ओमकार वाबळे

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात 1 नोव्हेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली होती.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली होती. त्याला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ईडीने सत्र न्यायालयाच्या ऑर्डरला चॅलेंज केलंय. ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यामध्ये उच्च न्यायालयाने ईडीच्या बाजूने निर्णय देत देशमुखांना धक्का दिला आहे.

14 दिवसांची कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयीन कोठडी पूर्ववत राहावी यासाठी देशमुखांच्या वकिलांनी प्रयत्न केले. मात्र, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत ईडीच्या बाजूने निर्णय दिला आहे.

देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाने ईडीला धक्का देत अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय बदलत ईडीच्या बाजूने आदेश दिले. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT