Education esakal
महाराष्ट्र बातम्या

Education: शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांच्या खिशाला कात्री; शालेय साहित्याच्या दरात २५ ते ३० टक्क्यांची वाढ

खरेदीसाठी बाजारात गर्दी

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर: नवीन शैक्षणिक वर्षाला उद्यापासून सुरवात होत आहे. शैक्षणिक साहित्याने बाजारपेठ गजबजली आहे. विद्यार्थी आणि पालकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी दोनशे रुपये डझन असणाऱ्या वह्या आता २५० रुपयांवर गेल्या आहेत. तसेच, ७ रुपयांना मिळणारा साधा पेन आता १० रुपयांना मिळत आहे, तर २५० रुपयांचे दप्तर ३०० रुपयांना झाले आहे.

नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस आणि रिक्षांच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे पालकांना यंदा साहित्य खरेदी करताना महागाईची झळ सोसावी लागत आहे.

सरकार देणार ड्रेस

सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना शासनाने ड्रेसकोड ठरविला आहे. त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना सरकार पहिल्या दिवशी एक ड्रेस देणार आहे. पाठ्यपुस्तकेही विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे पालकांचा काही भार हलका झाला आहे.

कागद, शाईसह वाहतूक महागल्याने दरवाढ

जगभरात कागद, शाई, स्टीलचे दर वाढले आहेत. याचा परिणाम शालेय साहित्यावर झाला असून वह्या, नवनीतसह इतर कंपन्यांच्या प्रिंटेड स्टेशनरीचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश व अन्य साहित्याची विक्री झाली नाही. वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किमतीमुळे शैक्षणिक साहित्य महागले आहे, असे विक्रेते सांगतात.

असे आहेत साहित्याचे दर

पेन - ११ ते २० रुपये

वॉटर बॅग - १०० ते ३०० रुपये

कंपास पेटी - १०० ते २५० रुपये

टिफीन बॉक्स - १५० ते २०० रुपये

रेनकोट - २५० ते ६०० रुपये

स्कूल बॅग - ३५० रुपयांपासून पुढे

वह्या - २५० ते ३५० रुपये डझन

शूज - ४०० ते ८०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT