Disle Guruji Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

ग्लोबल पुरस्कार प्राप्त डिसले गुरुजींवर शिक्षण विभागाकडून कारवाई

डिसले गुरुजी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत.

सुधीर काकडे

ग्लोबल पुरस्कार प्राप्त डिसले गुरूजी (Global teacher Award 2020 Ranjitsinh Disale) यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यांना नियुक्ती दिलेल्या शाळेत ते गैरहजर राहिल्याने ही कारवाई (Action Against Ranjitsinh Disale Guruji) होत असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण अधिकारी किरण लोहार (kiran lohar) यांनी ही माहिती दिली असून, त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. या सर्व कारवाईच्या पार्श्वभूमिवर डिसले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण नोकरी सोडण्याचा विचार करत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

डिसले गुरुजींवर कारवाई सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. किरण लोहार यांनी याबद्दल माहिती देताना, डिसले गुरूजी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर सोलापूर येथे नियुक्तीच्या ठिकाणी ३ वर्ष गैरहजर होते, मात्र त्यांनी त्या कालावधीतील पगार घेतला आहे. त्यांच्या पासपोर्टच्या नोंदी दाखवलेल्या नाहीत. एखादा कर्मचारी देश सोडून बाहेर जातो, तेव्हा त्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची परवानगी घेणं आवश्यक असतं. मात्र कुणालाही कल्पना न देता ते गैरहजर राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल असं लोहार यांनी सांगितलं.

‘ग्लोबल टीचर’ रणजित डिसले यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. समितीने मार्च २०२१ मध्ये अहवाल दिला. तत्कालीन शिक्षणाधिकारी व परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांच्या काळातील चौकशी अहवाल आता शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी बाहेर काढला आहे.

या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव लोहार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दिलीप स्वामी यांच्याकडे सादर केला आहे. परितेवाडी (ता. माढा) येथील जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक रणजित डिसले यांच्या पुरस्काराबाबत चौकशी करावी, अशी मागणी २०१७ मध्ये केली होती. या मागणीवरून पाच सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. डिसले यांनी प्राप्त पुरस्कारासाठी आपले नामांकन सादर करण्यासाठी या कार्यालयाची परवानगी घेतली नाही. पुरस्कार दिलेल्या संस्थेकडून झालेला पत्रव्यवहार व इतर माहिती चौकशी समितीला देण्यास डिसले यांनी नकार दिला असल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. डिसले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. चौकशी अहवाल माझ्या काळात मिळाला होता. त्यावर गट शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा आवश्‍यक होती. त्यासाठी मी या फाइलवर चर्चा करावी असे लिहिले. नंतरच्या कालावधीत हा विषय माझ्याकडून राहून गेला असं तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितलं.

दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disle) यांना अमेरिकन सरकारकडून (American government) दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप (Fulbright Scholarship) जाहीर झाली आहे. पीस इन एज्युकेशन (Peace in Education) या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी डिसले गुरुजींना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT