Ajit Pawar
Ajit Pawar esakal
महाराष्ट्र

राज्याच्या परिस्थितीवर अजित पवार दोन शब्दांत उत्तर; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील सध्याच्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आतापर्यंत भाष्य केलं नव्हते. मात्र, त्यांनी यावर त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले की, मी दर आठवड्याप्रमाणे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघालो आहे. यावेळी त्यांना राज्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारला असता त्यांना केवळ दोनच शब्दांत म्हणजे NO Comments असं उत्तर दिले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सर्वच घडामोडींवर अजित पवारांचे मौन का? असा प्रश्न उपस्थित होत असून, पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचं अंदाज बांधणं अवघड होऊन बसलं आहे. (AJit Pawar Latest News In Marathi)

काँग्रेसचे आमदार फुटले? बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं!

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मविआ सरकार बरखास्त होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. अशातच, शिंदेसोबत गुवाहाटी येथे असणारे बच्चू कडू यांनी काँग्रेसचे आमदारही आमच्यासोबत येणार असल्याचा दावा केला होता. हा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खोडून काढला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचे सर्वच्या सर्व म्हणजेच 44 आमदार पक्षासोबत असल्याचे म्हणाले. तसेच पक्षात कोणतेही वाद नसल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

PM मोदी तुकारामांच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले : भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मोठं विधान केले आहे. राजकारणी आहोत त्यामुळे सर्वच पक्षांनी नेहमी निवडणुकांसाठी तयार राहिले पाहिजे असे म्हटले आहे. यावेळी भुजबळ यांनी नरेंद्र मोदींबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) तुकारामांच्या भेटीला देहुत आले आणि एकनाथाला घेऊन गेले असेही छगन भुजबळ म्हणाले. (Chagan Bhujbal On Maharashtra Government)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT