eknath shinde camp esakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गटातील बड्या नेत्याला कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

धनश्री ओतारी

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरमुळे संजय राठोड महविकासआघाडीकाळात वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. दरम्यान, शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर महाविकासआघाडीतील नेत्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. या वादग्रस्त नेत्याला आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.(eknath shinde camp sanjay rathod infected corona positive )

मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोरोनाची लक्षणं नसल्यामुळे ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू आहेत. याबाबत संजय राठोड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. याचबरोबर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली. व ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती’. असे ट्विट संजय राठोड यांनी केले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांच्यावर काही गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर ठाकरे सरकारमध्ये त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढं असतानाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलेच वादंग पेटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT