Mahayuti Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar On Manusmriti: मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होणार का? शिंदे-फडणवीसांसमोर अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले

Monsoon Session Of Maharashtra Assembly 2024: यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभ्यासक्रमातील मनुस्मृतीच्या समावेशाबाबत मोठे भाष्य करत हा मुद्दा निकाली काढला.

आशुतोष मसगौंडे

महाराष्ट्र विधान मंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्त आज आयोजित केलेल्या चहापाणाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. यानंतर नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.

यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभ्यासक्रमातील मनुस्मृतीच्या समावेशाबाबत मोठे भाष्य करत हा मुद्दा निकाली काढला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे यावेळीही चहापाणावर बहिष्कार टाकला. मात्र त्यांनी सरकारला पत्र लिहित मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमातील समावेशाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. खरे तर या गरज नव्हती. कारण आम्ही सातत्याने सांगत आहे की, अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील कोणत्याही श्लोकाचा समावेश नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीता कोणत्याही प्रकारचा समावेश शक्य नाही."

पवार पुढे म्हणाले, "राज्यात शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होणार नाही हे स्पष्ट आहे. तरीही विरोधी पक्ष या मुद्द्यावरून खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून ते जाती-जातींमध्ये तेढ पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत."

"उद्यापासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्यासमोरील आणि सर्वसामान्यांची अधिकाधिक प्रश्न विधी मंडळात सोडवण्यासाठी महायुती सरकार म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत," असेही पवार यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे विरोधातल्या महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. वाढलेल्या या आत्मविश्वासामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडल्याचे पाहायला मिळू शकते. अशा स्थितीत अधिवेशनात काय काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: मोठी बातमी! नव्या प्रभागरचनेनुसार अन् OBC आरक्षणासह स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका होणार

Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या योजनेला शेतकरी संघटनांचा विरोध; १५ ऑगस्टला 'कर्जमुक्ती'ची घोषणा

बायकोसाठी अश्विन झालाय वेडा! घरात केलं असं काही की... प्रियाच्या बाबतीत रविराज घेणार मोठा निर्णय; ठरलं तर मग'मध्ये नवीन ट्विस्ट

Samruddhi Highway: समृद्धी मार्गावर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर, प्रत्येक हालचाल होणार कॅमेऱ्यात कैद

Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधन: राखी का बांधतात? जाणून घ्या या पवित्र सणाचे महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT