महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्रीपदी वर्णी लागताच शिंदेंचं पहिलं ट्वीट; म्हणाले.. ''हा...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. त्यावर आज अखेर पूर्णविराम लागला आहे. कारण एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी साडेसात वाजता शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिलं ट्वीट केले आहे.

मुख्यमंत्रीपदी नावाची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…असल्याचे म्हटले आहे.

नावाची घोषणा झाल्यानंतर काय म्हणाले शिंदे

शिंदे म्हणाले की, "आमदारांचं संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. "आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. शिवसेना पक्ष म्हणून कायदेशीर प्रक्रीया करून शिवसेनेचे तसेच अपक्ष आमदार मिळून आम्ही गेले काही दिवस एकत्र आहोत."

अडीच वर्षापूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे, गेल्या काही काळामध्ये मुख्यमंत्र्यांना मतदारसंघातील समस्या विकास प्रकल्प याबाबत वारंवार माहिती दिली, दुरूस्तीची मागणी केली, अनेक वेळा चर्चा केली, पण मविआ बाबत आमदारांमध्ये नाराजी होती, मतदार संघातील प्रश्न पाहाता पुढच्या निवडणूक लढताना येणार्‍या अडचणी हे लक्षात घेत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपण विरोधकांकडून सत्तेत जात आसतो पण मागील घटनाक्रम बघितला तर सत्तेतून विरोधकांकडे जाण्याचा प्रकार घडला" असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT