Eknath Shinde group 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याला 4 मंत्री, 2 आमदारांची दांडी; चर्चांना उधाण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याच्या सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळंच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे आमदार आणि खासदार सहकुटुंब आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. मात्र या दौऱ्याला चार मंत्री आणि दोन आमदारांनी दांडी मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. (Eknath Shinde group news in Marathi)

एकनाथ शिंदे गटाने आज कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावेळी शिंदे गटाचं आसाममध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. मात्र या दौऱ्यात मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभुराज देसाई आमदार चंद्रकांत पाटील आणि महेश शिंदे गैरहजर राहिले आहेत.

यावर या नेत्यांकडून स्पष्टकरण देण्यात आलं असून आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्हा आमदारांची इच्छा होती गुवाहाटीला जाण्याची, मात्र आज ग्रामीण भागात लग्नाची तिथी होती. त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. तर गुलाबराव पाटील म्हणाले की, निवडणुकीमुळे मी जावू शकलो नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली होती.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, मी नाशिकला आधीच वेळ दिला होता. नाशिक येथे शेतकऱ्यांचा कार्यक्रम होता. नाशिकमध्ये अनेक प्रयोग होतात. त्या प्रयोगांचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा, म्हणून मी नाशिकमध्ये होतो. तर अनिल बाबर म्हणाले की, बायकोचा वाढदिवस आहे. उद्या घरगुती कार्यक्रम आहे. त्यामुळे गुवाहाटीला जावू शकलो नाही. एकंदरीतच मंत्र्यांनी आणि आमदारांनी दांडी मारल्यामुळे शिंदे गटात नाराजी कायम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर कडाडून टीका करण्यात आली. महाराष्ट्रातील देवं संपले का, जे दर्शनासाठी गुवाहाटीला गेले, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT