hemant-rasne
hemant-rasne 
महाराष्ट्र

Kasba Bypoll Election : भाजप उमेदवार हेमंत रासने अडचणीत? आचारसंहितेच्या शिस्तीचा केला भंग

सकाळ डिजिटल टीम

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन्ही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. कसबा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. दरम्यान, भाजप उमेदवार हेमंत रासने अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Election Commission will take action against BJP candidate Hemant Rasane for breach the code of conduct)

हेमंत रासने यांनी थेट मतदान केंद्रात भाजप या पक्षाचे चिन्ह असलेली पट्टी गळ्यात घालून प्रवेश केला. या प्रकारामुळे रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्ट दिसून आले.

उमेदवार असूनही निवडणूक चिन्ह असलेली पट्टी गालून मतदान केंद्रावर १०० मीटरच्या आत प्रवेश कसा केला? बंदोबस्तसाठी असलेले पोलिसांनी तसेच निवडणूक कर्मचारी यांनी प्रतिबंध कसं केलं नाही. असा सवाल उपस्थित होत आहे.

मतदानादिवशी रासने यांनी उल्लंघन केले असल्याने या प्रकाराची आपण गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करुन त्यांची उमेदवारी रद्द करावी तसेच इतर कर्तव्यात कसूर करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांवर देखील कडक कारवाई कराही.

अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रुपाली पाटील यांनी केली आहे. त्यामुळे निवडणुक आयोग कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT