काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

२६-११च्या हल्लातील सरकारी वकील उज्वल निकम रिंगणात असताना हा वाद उकरून काढण्याची मुळात गरजच नव्हती, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे
राधानगरी येथील प्रचारसभेत संबोधित करताना विजय वडेट्टीवार
राधानगरी येथील प्रचारसभेत संबोधित करताना विजय वडेट्टीवारvijay wadettiwar x account

मुंबई :  मुंबई : हुतात्मा पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल विधानसभेचे विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी वडेट्टीवार यांची चांगलीच कानउघाडणी केली असून लोकसभा निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्यास सांगितले असल्याचे कळते.

मुंबईवरील २६-११च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवाद्यांची नसून की एका पोलिस अधिकाऱ्याची होती असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी प्रचारादरम्यान केला होता. या विधानानंतर वडेट्टीवार यांच्याविरुध्द भाजपने रान उठवले आहे.

राधानगरी येथील प्रचारसभेत संबोधित करताना विजय वडेट्टीवार
Congress Manifesto : काँग्रेसचा जाहीरनामा भयानक केशव उपाध्ये यांची टीका

यावेळी हिंदू-मुस्लीम असे ध्रुवीकरण होईल असे वाद टाळण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाला आहे. मात्र असे असताना मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रश्‍न उकरून काढून काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवार यांनी पाणी ओतले आहे. तत्कालीन सरकारी वकील उज्वल निकम रिंगणात असताना हा वाद उकरून काढण्याची मुळात गरजच नव्हती, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

वाद टाळले पण...

दुसरीकडे यावेळी हिंदू-मुस्लीम असे ध्रुवीकरण होणार नाही, असे कुठलेही वाद टाळण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाले आहे. मात्र असे असताना मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रश्न उकरून काढल्यानंतर काँग्रेसच्या प्रयत्नांवर वड्डेटीवार यांच्यामुळे पाणी फेरले गेले. २६-११च्या हल्लातील सरकारी वकील उज्वल निकम रिंगणात असताना हा वाद उकरून काढण्याची मुळात गरजच नव्हती, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. हा आरोप माजी पोलिस आयुक्त एम. एस. मुश्रीफ यांनी ‘व्हू किल्ड करकरे’ या पुस्तकातून केले आहेत.

राधानगरी येथील प्रचारसभेत संबोधित करताना विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

नेत्यांनी झटकले हात
वड्डेटीवार यांचे वैयक्तीक विधान असून काँग्रेसचे नाही, असे रमेश चेन्नीथला यांनी आज स्पष्ट केले. सोमवारी (ता.६) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसचे मत नसल्याचे सांगून वड्डेटीवार यांच्यापासून हात झटकले. काँग्रेसच्या सरकारने कसाबला फाशी दिल्याचेही त्यांनी सांगितले. वड्डेटीवार यांनी १० वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकाला कोट करण्याचा प्रयत्न केला, अशी सारवासारव त्यांनी केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हेच मत व्यक्त केले.

हा मुद्दा उपस्थित करण्याची गरज काय?  
1. वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दूरध्वनी करून विजय वड्डेटीवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मुळात २६-११ चा हल्ला झाला असताना राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. असे असताना हा मुद्दा उपस्थित करण्याची गरजच काय होती? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला.

2. तत्कालीन काँग्रेस सरकारने या खटल्यात विशेष वकील म्हणून उज्वल निकम यांना संधी दिली होती. त्यानंतर ते प्रकाशझोतात आले याची आठवणही काँग्रेस नेत्यांनी करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com