Electric vehicles Demand 
महाराष्ट्र बातम्या

Electric vehicles : राज्यात ई वाहने ‘टॉप गिअर’वर

मुंबईत ११२ टक्के वाढः सर्वाधिक ई-वाहने पुणे शहरात, पिंपरी-चिंचवड दुसरे

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर तोडगा म्हणून इलेक्ट्रिक (विद्युत) वाहनांवर अधिक भर देण्यात येत आहे. मुंबईत जानेवारी ते सप्टेंबरदरम्यानच्या नऊ महिन्यांत ई-वाहने खरेदीमध्ये ११२ टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यात हेच प्रमाण १५७ टक्के आहे.

मुंबईमध्ये नऊ हजार १८६ ई-वाहनांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण आकडा ८७ हजार ७१८ हजार आहे. राज्यात सर्वाधिक ई-वाहने पुणे शहरात (१६,४७७) आहेत. त्याखालोखाल पिंपरी-चिंचवडचा (१०,४८८) क्रमांक लागतो. ई -वाहनांसाठी २०२५ पर्यंत मुंबईसह एमएमआर क्षेत्रात दहा जार चार्जिंग स्थानकांची गरज आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असून राज्य स्तरावर नवीन धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सध्या मुंबईत २५० चार्जिंग स्थानके आहेत. मुंबई महापालिका, बेस्ट, टाटा, एचपीसीएल इत्यादी सार्वजनिक आणि खासगी संस्थांचा त्यात समावेश आहे. पालिकेने सार्वजनिक ई-चार्जिंग स्टेशन उभारली आहेत.

‘वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट’च्या अहवालानुसार

  • राज्यात २०२५ पर्यंत दोन लाख १९ हजार २४५ तर २०३० पर्यंत १२ लाख आठ हजार ७०४ ई-वाहनांची भर

  • २०२५ पर्यंत २१ हजार ९६; तर २०३० पर्यंत एक लाख ४१ हजार ९८८ चार्जिंग स्थानकाची गरज

  • चार्जिंग स्थानकांसाठी साधारण ५५० मेगावॉट अश्‍वशक्तीची गरज भासणार

ई -वाहनांच्या नोंदणीत वाढ (आकडे टक्क्यांत)

  • ९ - दुचाकी

  • ९ - तीनचाकी

  • ३ - चारचाकी

राज्यातील ई-वाहने

  • ८७,७१९ - एकूण संख्या

  • ८५ टक्के - दुचाकी

  • ५ टक्के - तीनचाकी

  • ९ टक्के - चारचाकी

  • २३ -ऑक्टोबरमध्ये खरेदीत वाढ

मुंबईतील ई-वाहने

वर्ष वाहन

  • २१-२२ - ३,०५९

  • २०-२१ - १,४२२

  • १९-२० - ६४२

राज्याचे ईव्ही चार्जिंग धोरण अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल. तोपर्यंत शक्य तितके ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईला प्रदूषणाच्या विळख्यातून काही प्रमाणात बाहेर काढणे त्यामुळे शक्य होईल.

- अतुल पाटील, उपायुक्त, पर्यावरण विभाग, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT