Online Admission
Online Admission Sakal
महाराष्ट्र

राज्याच्या महानगरांतील अकरावी प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्टपासून

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्याच्या महानगरांतील अकरावीचा प्रवेश (Eleventh Admission) केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने (Online Process) होणार असून, यासाठी १६ ऑगस्टपासून अर्ज (Form) दाखल करण्यास सुरवात होत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या प्रवेशासाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डी.जी. जगताप यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

विद्यार्थी आणि पालिकांमधील संभ्रम, तसेच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जागृतीचा अभाव असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया राबविण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधाच मुदतवाढ करत १६ ऑगस्टपासून सूरू करण्यात येत असल्याचे जगताप यांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव व्हावा म्हणून मॉक डेमोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा शुक्रवार (ता.१३) पर्यंत उपलब्ध असेल. त्यानंतर सर्व माहिती नष्ट होईल आणि १६ तारखेनंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरण्यात येईल.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक -

(फक्त संबंधित महापालिका क्षेत्रांसाठी)

कार्यवाहीचे टप्पे - कालावधी - कोण करणार

१) अ) संकेतस्थळावर विद्यार्थ्याने ऑनलाइन नोंदणी करणे. लॉगईन आयडी व पासवर्ड तयार करणे. ब) अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि शुल्क भरणे क) अर्जातील माहिती शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित करणे, शाळा निवडणे आणि अर्ज व्हेरिफाईड झाल्याची खात्री करणे - १६ ऑगस्टपासून (हे विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने करावे)

२) विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील माहिती भाग-१ ऑनलाइन तपासून प्रमाणित करणे - १७ ऑगस्ट पासून (माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शक केंद्रांनी करावे)

महत्त्वाचे काय? -

- सराव म्हणून संकेतस्थळावर १३ तारखेच्या आत डेमो अर्ज भराल

- यात अडचण आल्यास आपल्या शाळेशी संपर्क साधा

- १३ तारखेनंतर हे अर्ज नष्ट होतील

- पालकांच्या मदतीने प्रत्यक्ष अर्ज १६ तारखेपासून भरावे

अर्ज दाखल करण्यासाठीचे संकेतस्थळ - https://11thadmission.org.in/

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT