solapur

महाराष्ट्र बातम्या

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा पेपरच रद्द! प्रथम वर्षाच्या परीक्षेत नियमित विद्यार्थ्यांना दिली ‘पुरवणी’ची प्रश्नपत्रिका; ‘डी-बाटू’च्या परीक्षेतील प्रकार; आता ३१ जुलैला पेपर, वाचा...

सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे (डी-बाटू) अभियांत्रिकीच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी (ता. १४) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग ग्राफिक्स विषयाचा पेपर होता. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यापीठाकडून संलग्न महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठविण्यात आली. मात्र, ती नियमित विद्यार्थ्यांची नसून पुरवणी परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याचे तब्बल दोन तासांनी लक्षात आले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे (डी-बाटू) अभियांत्रिकीच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी (ता. १४) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग ग्राफिक्स विषयाचा पेपर होता. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यापीठाकडून संलग्न महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठविण्यात आली. मात्र, ती नियमित विद्यार्थ्यांची नसून पुरवणी परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याचे तब्बल दोन तासांनी लक्षात आले. त्यामुळे ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली.

सोलापूर जिल्ह्यातील १६ पैकी सात अभियांत्रिकी महाविद्यालये ‘डी-बाटू’शी संलग्न आहेत. त्यामध्ये व्हीव्हीपी, सिद्धेश्वर वुमन्स (सोलापूर), भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय (केगाव), फॅबटेक, आर्किड, केआयटी (शेळवे) आणि ए. जी. पाटील महाविद्यालयाचा समावेश आहे. मंगळवारी ‘डी-बाटू’शी संलग्न सर्व महाविद्यालयांतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा द्वितीय सत्रातील इंजिनिअरिंग ग्राफिक्स विषयाचा पेपर होता. नियोजित वेळेनुसार विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये बसले. पर्यवेक्षकांनी ऑनलाइन प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या प्रती काढून विद्यार्थ्यांना वाटप केल्या.

विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली आणि चार तासांच्या पेपरपैकी दोन तास उलटल्यानंतर अचानक प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, ‘डी-बाटू’कडून अपरिहार्य कारणास्तव संबंधित पेपर रद्द करण्यात आल्याचा ई-मेल संलग्न महाविद्यालयांना प्राप्त झाला. सुरुवातीला महाविद्यालयांनाही पेपर रद्द करण्यामागील कारण समजले नव्हते. मात्र, नियमित विद्यार्थ्यांना चुकून पुरवणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. आता या विषयाची परीक्षा ३१ जुलै रोजी पुन्हा घेतली जाणार आहे.

‘त्या’ कर्मचाऱ्याला पॅनलवरून हटविले

अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या इंजिनिअरिंग ग्राफिक्स विषयाच्या परीक्षेसाठी नजरचुकीने पुरवणी परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पाठविण्यात आली. दोन तासांनी ही चूक लक्षात आल्यानंतर संबंधित पेपर रद्द करण्यात आला. या प्रकाराला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्याला पॅनलवरून वगळण्यात आले असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

- डॉ. राजनीश कामत, प्रभारी कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे

महाविद्यालयांना आता स्थानिक विद्यापीठाची संलग्नता?

सध्या लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी राज्यातील ४५५ अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालये संलग्न आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांनाही याच विद्यापीठाशी संलग्न राहण्याचे बंधन आहे. दुसरीकडे, अनेक विद्यमान महाविद्यालयांची स्थानिक विद्यापीठाशी संलग्न होण्याची इच्छा आहे. मात्र, ‘डी-बाटू’च्या विद्यमान कायद्यात त्यासाठी तरतूद नसल्याने इच्छेविरुद्धही अनेक महाविद्यालयांना ‘डी-बाटू’शीच संलग्न राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २१) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व प्राचार्यांची बैठक बोलावली असून, या बैठकीत या प्रश्नावर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT