Board Exam esakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्ह्यात इंग्रजी, हिंदी, मराठीचे पेपर कॉपीविना! ११८ पैकी एकाही केंद्रावर अनुचित प्रकार नाही; भरारी, बैठे पथकांसह पोलिसांची उत्तम कामगिरी

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे भाषा विषयाचे पेपर शुक्रवारी संपले. जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर ही परीक्षा होत असून पहिल्या तिन्ही पेपरवेळी एकही कॉपी प्रकरण समोर आलेले नाही हे विशेष. इंग्रजी, हिंदी व मराठी विषयांचे पेपर कॉपीमुक्त पार पडल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे भाषा विषयाचे पेपर शुक्रवारी (ता. २३) संपले. जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर ही परीक्षा होत असून पहिल्या तिन्ही पेपरवेळी एकही कॉपी प्रकरण समोर आलेले नाही हे विशेष. इंग्रजी, हिंदी व मराठी विषयांचे पेपर कॉपीमुक्त पार पडल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी दिली.

जिल्ह्यात करमाळ्यातील महात्मा गांधी विद्यालय, बार्शीतील सुलाखे हायस्कूल, माढ्यातील नूतन विद्यालय (कुर्डुवाडी), अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय, पंढरपुरातील ह. द. कवठेकर प्रशाला, मोहोळमधील नागनाथ विद्यालय, सांगोल्यातील सांगोला विद्यामंदिर, मंगळवेढ्यातील न्यू इंग्लिश स्कूल, अक्कलकोटमधील शहाजी हायस्कूल, सोलापुरातील भारती विद्यापीठ ज्यू. कॉलेज (विजयपूर रोड) व मुरारजी पेठेतील संभाजीराव शिंदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची परिरक्षक केंद्रे आहेत. त्याअंतर्गत असलेल्या ११८ परीक्षा केंद्रांना तेथूनच प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वितरित होतात. शुक्रवारी मराठी विषयाच्या पेपरला पंढरपूर तालुका व सोलापूर शहरातील एकूण ३२१ विद्यार्थी गैरहजर राहिले. एकूण ३८ हजार २७६ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात मराठी विषयाचा पेपर सोडविला.

मराठीच्या पेपरला ८५५ विद्यार्थ्यांची दांडी

इयत्ता बारावीचा शुक्रवारी मराठी विषयाचा पेपर पार पडला. या पेपरसाठी जिल्ह्यातील ३८ हजार २७६ विद्यार्थी बसणे अपेक्षित होते. पण, ८५५ विद्यार्थी विविध कारणास्तव परीक्षेला येऊ शकले नाहीत. मराठीच्या पेपरसाठी ४९ दिव्यांग विद्यार्थी बसले होते. ११८ परीक्षा केंद्रांपैकी एकाही केंद्रावर मागील तीन पेपरमध्ये कॉपी केस आढळलेली नाही हे विशेष.

वरिष्ठांच्या ठोस नियोजनामुळे कॉपीमुक्त परीक्षा

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे तीन दिवसात इंग्रजी, हिंदी व मराठी असे भाषा विषयांचे पेपर पार पडले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या अचूक नियोजनामुळे आतापर्यंत एकही कॉपी केस आढळलेली नाही. संवेदनशील केंद्रांवर पाच पोलिस व तीन जणांचे बैठे पथक नेमले आहे. बैठे पथके, भरारी पथके, पोलिस बंदोबस्त यामुळे यंदाची परीक्षा कॉपीमुक्त पार पडेल, असा विश्वास आहे.

- मारुती फडके, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT