European Bhoradya exercises on Fields at the bank of Krishna river; Spectacular movement of migratory birds
European Bhoradya exercises on Fields at the bank of Krishna river; Spectacular movement of migratory birds 
महाराष्ट्र

कृष्णाकाठी शिवारात चालतात युरोपियन भोरड्याच्या कवायती; स्थलांतरीत पक्षांचे नयनमनोहर संचलन

सतीश तोडकर

भिलवडी (जि. सांगली) : कृष्णाकाठावरील शेतशिवारात सायंकाळी युरोपियन भोरडी पक्षांच्या नयनरम्य कवायती होत आहेत. क्षणात खाली-वर लयबध्द विहार करीत या स्थलांतरीत पक्षांचे थवे आकाशात संचलन करीत आहेत. 


भोरडी पक्षी दरवर्षी जुलै-ऑगष्ट दरम्यान पूर्व युरोप, मध्य आशियातून भारतात येतात. रोझी स्टर्लिंग असे त्यांचे इंग्रजी नाव. एप्रिलअखेर त्यांचा इथे मुक्काम असतो. महाराष्ट्र व पंजाबमध्ये त्यांचा वावर असतो. शेकडोच्या संख्येने त्यांचे थवे हवेत विहार करतात. 


डोके, मान, छातीच्यावरील भाग, पंख व शेपटी चमकदार काळी असते. लांब टोकदार तुरा मानेवर दिसतो. आकार साधारण साळुंखी एवढा वीसभर सेंटीमीटरचा असतो. मे - जून त्यांच्या विणीचा कालावधी असतो. मादी तीन-चार निळ्या रंगाची अंडी घालते. वीण युरोप-आशियातील वसाहतींमध्ये होते. 
वड, पिंपळ, तुती, काटेसावर, काटेरी बाभळ, देशी झाडांवर हे पक्षी थांबतात. पक्व ज्वारी, बाजरी, टोळ, किटक हे त्यांचे अन्न आहेत. पिकांचा फडशा पाडत असले तरी टोळ-किटकांना भक्ष करीत एकप्रकारे शेतीसाठी उपयुक्त ठरतात. पळस, काटेसावर वृक्षांची फळे व त्यातील मकरंद आवडीने खातात. त्यांना पळसमैना, गुलाबमैना असेही म्हणतात. 


पलुस तालुक्‍यातील नागठाणे, अंकलखोप, दुधोंडी, बुर्ली, आमणापूर परिसरात त्यांचा वावर आहे. मौटी, भटकी भागातील बाभळी शेतशिवार, नदीकाठ, हजारवाडी येथील गॅस फॅक्‍टरी परिसर, द्राक्षबागा, गर्द झाडीत त्या मुक्काम करतात. सकाळी अन्नाचा शोध, दुपारी विश्रांती व सायंकाळी स्नान व कवायत असा दिनक्रम सुरू आहे. 


सायंकाळी थव्याने आकाशात भिरकावत मावळतीच्या संधी प्रकाशात त्यांच्या कवायती सुरू होतात. शेकडोंच्या संख्येचे वेगवेगळे थवे चित्र-विचित्र अशा आकृत्या हवेत तयार करतात. वेगाने क्षणात खाली-वर जात, तिरके-गोलाकार फिरत त्यांचा आकाशातील विहार लक्ष वेधून घेतो. 


विशेष म्हणजे या कसरती करताना ते एकमेकांना धडकतही नाही. दाट अंधार होईपर्यंत त्यांचा खेळ सुरू असतो. 

पक्षी निरिक्षणाचा आनंद वेगळाच

दरवर्षी कृष्णाकाठी अनेक परदेशी पक्षी येतात. आपल्या परिसंस्थेतील त्यांचे महत्वाचे अंग आहे. बीज 
प्रसारात ते महत्वाची भूमिका बजावतात. पक्षी निरिक्षणाचा आनंद वेगळाच असतो. विद्यार्थी, नागरिकांनी 
तो घ्यावा. 

- संदिप नाझरे, पक्षीप्रेमी, आमणापूर 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT