PSI Exam esakal
महाराष्ट्र बातम्या

तीन वर्षे झाली, तरी ‘PSI’साठी निवडल्यांचे नाही ट्रेनिंग! सोलापुरातील ४२ उमेदवारांची मेडिकल होईना; मेडिकल कॉलेजच्या अधिकारी समजून घेत आहेत शासन निर्णय

‘एमपीएससी’ने जून २०२२ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. उमेदवारांची पूर्व परीक्षा ऑक्टोबर २०२२ मध्ये झाली, पण मुख्य परीक्षा व निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी तब्बल दोन वर्षे लागली. आता नाशिक येथे प्रशिक्षणास जाण्यापूर्वी अंतिम निवड झालेल्यांची वैद्यकीय चाचणी करायची आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : ‘एमपीएससी’ने जून २०२२ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. उमेदवारांची पूर्व परीक्षा ऑक्टोबर २०२२ मध्ये झाली, पण मुख्य परीक्षा व निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी तब्बल दोन वर्षे लागली. आता नाशिक येथे प्रशिक्षणास जाण्यापूर्वी अंतिम निवड झालेल्यांची वैद्यकीय चाचणी करायची आहे. मात्र, सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांना शासन निर्णय समजून घ्यायला विलंब होत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील ४२ भावी पोलिस उपनिरीक्षकांची वैद्यकीय चाचणी अजूनही होऊ शकलेली नाही.

राज्यातील पोलिस उपनिरीक्षकांच्या ६०३ पदांसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा पार पडली. मुख्य परीक्षा, मुलाखती व मैदानी चाचणी, अशा अंतिम टप्प्यांवर सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ४२ उमेदवारांनी यश मिळविले. आता पुन्हा त्या उमेदवारांना ‘सरकारी काम आणि काही दिवस थांबच’ याचा अनुभव येऊ लागला आहे. पोलिस अधीक्षकांच्या पत्रानुसार ते सगळे उमेदवार सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेले. त्यावेळी त्यांना वैद्यकीय अधीक्षकांनी शासन निर्णयानुसार वर्ग एक व दोन संवर्गातील उमेदवारांची वैद्यकीय चाचणी मेडिकल बोर्डाकडून होते असे सांगितले. वास्तविक पाहता तो नियम राजपत्रित अधिकाऱ्यांसाठीच लागू आहे. वर्ग-२ च्या अराजपत्रित अधिकाऱ्यांची मेडिकल चाचणी अन्य जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधूनच झाली, तरीदेखील सोलापूरच्या मेडिकल कॉलेजकडून त्या उमेदवारांना हेलपाटे लावले जात आहेत. काही उमेदवारांना रात्री उशिरा मेडिकलसाठी या असा निरोप आल्याचे सांगण्यात आले. पण, त्या सर्व उमेदवारांची बुधवारी वैद्यकीय चाचणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

उमेदवारांसाठी संस्मरणीय परीक्षा

  • जाहिरात प्रसिद्ध : जून २०२२

  • पूर्व परीक्षा : ८ ऑक्टोबर २०२२

  • मुख्य परीक्षा : १० ऑक्टोबर २०२३

  • मैदानी चाचणी : ३० मे २०२४

  • मुलाखत : जुलै २०२४

  • सर्वसाधारण निवड यादी : ऑगस्ट २०२४

  • अंतिम निवड यादी : ६ जानेवारी २०२५

  • सोलापूरच्या उमेदवारांची मेडिकल चाचणी : अजूनही नाही

माहिती घेऊन लवकरच कार्यवाही

‘पीएसआय’ म्हणून निवड झालेल्या उमेदवारांची मेडिकल चाचणी करण्यासंदर्भातील विषय नेमका काय? हे मला पहावे लागेल. त्यासंदर्भातील माहिती घेऊन पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT