Ladki Bahin Yojana  esakal
महाराष्ट्र बातम्या

वाहन नाही, तरी महिलांच्या नावे वाहनांची नोंद! जाब विचारायला २००० महिला सोलापूरच्या महिला व बालविकास कार्यालयात, ई-केवायसी केली, दुरुस्तीही केली, तरी लाभ बंद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीपासून लाभ न मिळालेल्या महिलांची संख्या अर्ध्या कोटीवर आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 4 लाख महिलांचा समावेश आहे. 3 महिन्यांनंतर आता 2 महिन्यांचे 3000 रुपये वितरित झाले. मात्र, पैसे न मिळालेल्या महिला जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात येऊन जाब विचारू लागल्या आहेत. सोमवारी (ता. १८) सोलापुरातील कार्यालयात सुमारे 1500-2000 महिला आल्या होत्या.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीपासून लाभ न मिळालेल्या महिलांची संख्या अर्ध्या कोटीवर आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 4 लाख महिलांचा समावेश आहे. 3 महिन्यांनंतर आता 2 महिन्यांचे 3000 रुपये वितरित झाले. मात्र, पैसे न मिळालेल्या महिला जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात येऊन जाब विचारू लागल्या आहेत. सोमवारी (ता. १८) सोलापुरातील कार्यालयात सुमारे 1500-2000 महिला आल्या होत्या.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीकडे चारचाकी वाहन नसावे, अशी अट आहे. पण अनेक महिलांच्या नावे वाहन नाही, तरीदेखील पोर्टलवर वाहनाची नोंद दाखवत आहे. त्याबाबत ‘आरटीओ’ कार्यालयाकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडेही संबंधित महिलेच्या नावे वाहनाची नोंद दिसत नाही. दुसरीकडे, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, ‘ई-केवायसी’ चुकीची केली, वय कमी किंवा जास्त असल्याची कारणे पोर्टलवर दाखविली जात आहेत. विशेष म्हणजे अनेक महिला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करतात, तरीदेखील त्यांची पोर्टलवर आयकरदाते म्हणून नोंद झाली आहे. एकूणच लाभ न मिळालेल्या हजारो महिला दररोज रिक्षा भाड्याने करून, तर काही एसटी बसने जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. पोर्टल बंद किंवा सर्व्हर डाऊनमुळे अनेक महिलांना परत पाठवावे लागत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पंचाईत

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी, विशेषतः भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरांतील प्रभागांमध्ये व गावागावांतील महिलांचे अर्ज भरून घेतले. त्यानंतर ‘ई-केवायसी’देखील करून दिली. मात्र, आता लाभ न मिळालेल्या महिला दररोज संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांच्या घरी जात आहेत. त्यांनाही त्यामागील नेमके कारण सांगता येत नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

तालुक्यातील प्रकल्प कार्यालयातही समजेल लाभ बंद झाल्याचे कारण

लाडकी बहीण योजनेतील लाखो लाभार्थींना आता लाभ मिळालेला नाही. या महिलांना पैसे का आले नाहीत किंवा त्यांचा लाभ बंद का झाला, याचे कारण जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयातून समजते. त्यामुळे हजारो महिला दूरदूरवरून जिल्ह्याच्या कार्यालयात येत आहेत. मात्र, तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयातूनही त्यांना लाभ बंद होण्याचे कारण समजू शकते. त्यामुळे त्या महिलांनी शेकडो किलोमीटरवरून सोलापुरात येण्याऐवजी तालुक्यातील कार्यालयात जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दररोज महिला कार्यालयात येत आहेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळालेल्या हजारो महिला दररोज कार्यालयात येत आहेत. आमच्या लॉगिनवरून त्यांना लाभ न मिळाल्याचे नेमके कारण सांगितले जात आहे. दुसरीकडे, ‘ई-केवायसी’ दुरुस्तीची मुदत ३० एप्रिलला संपली, पण अनेक महिलांनी मुदतीत दुरुस्ती केलेली नाही. तसेच ‘ई-केवायसी’च न केलेल्या महिलांचीही संख्या मोठी आहे. त्यासंदर्भातील पत्रव्यवहार शासन स्तरावर केला आहे.

- अविनाश मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरचा विधानपरिषदेचा आमदार भाजपचाच! ५५५ पैकी ३१३ मतदार भाजपचे; शिवसेनेचे ६६ तर राष्ट्रवादीकडे अवघे २७ मतदार, ‘या’ ६ नेत्यांपैकी एकाला उमेदवारी, वाचा...

Healthy and Tasty Breakfast Smoothie: सकाळच्या घाईत नाश्ता स्किप करू नका; फक्त 3 पदार्थांत तयार करा हेल्दी आणि टेस्टी स्मूदी

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

SCROLL FOR NEXT