corona update sakal
महाराष्ट्र बातम्या

सर्वांनी ‘ही’ पंचसूत्री पाळावी, कोरोनाचा धोका होणार नाही! अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिक माहितीसाठी १०४ हेल्पलाइनवर संपर्क करा

आवश्यकतेनुसार मास्क वापरा, वारंवार हात साबणाने धुवा, दोघा व्यक्तींमध्ये सहा फुटांचे सुरक्षित अंतर असावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा आणि चुकीची माहिती इतरांना देऊ नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी पंचसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार मास्क वापरा, वारंवार हात साबणाने धुवा, दोघा व्यक्तींमध्ये सहा फुटांचे सुरक्षित अंतर असावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा आणि चुकीची माहिती इतरांना देऊ नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

ओमायक्रॉच्या ‘जेएन-वन’ व्हायरसमुळे सध्या भितीचे वातावरण आहे, पण सर्वांनी खबरदारी घेतल्यास घाबरण्यासारखे काहीच नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पण, नागरिकांनी संशय वाटल्यास कोरोनासंबंधीची चाचणी स्वत:हून करून घ्यावी. आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरूच असून आजारी रूग्णांवर तातडीने उपचार देखील केले जात आहेत. नागरिकांना काहीही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी १०४ या टोल फ्री क्रमांकाच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी केले आहे.

ताप अंगावर काढू नका, जेणेकरून धोका वाढणार नाही, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अशा आपत्ती काळात नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, कोणती लक्षणे असल्यावर दवाखान्यात जावे, अशा पत्रिकांद्वारे जनजागृती करायला सुरवात केली आहे. आरोग्य विभागानेही पूर्वतयारी केली असून सर्वच शासकीय रूग्णालयांना सूचना केल्या आहेत. दवाखान्यांमध्ये गेलेल्या संशयित रूग्णांची चाचणी करण्यासंदर्भातही निर्देश दिले आहेत.

‘ही’ लक्षणे असल्यास उपचार घ्या...

  • सतत खोकला येतोय आणि काही दिवसानंतरही तो बरा होत नाही

  • अचानक आलेला ताप काही दिवसानंतरही गेला नाही, त्यावेळी उपचार घ्या

  • खूप दिवसानंतरही घसा खवखतोय, अशावेळी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत

  • श्वास घ्यायला त्रास होते असल्यास ताबडतोब दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT