Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

दारूचं बिल थकलं? शिंदे गटातील आमदारांची 'सोय' कोणी लावली

सकाळ डिजिटल टीम

विधानपरिषदेचा निकाल लागल्यानंतर शिंदेंच्या गटाने मोठी बंडखोरी करत सूरत गाठलं. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आमदार सूरतेला दाखल झाले. आणि तिकडून थेट गुवाहाटी गाठलं. गुवाहाटीत दिवसेंदिवस आमदारांची संख्या वाढू लागली आणि शिंदे गट आणखी बळकट झाला. पण मागील सहा दिवसांपासून आमदारांची 'सेव्हन स्टार' हॉटेलमध्ये सोय कोणी केली, याची चर्चा सुरू आहे. आमदारांची व्यवस्था लावण्यात मोठ्या प्रमाणात खर्च सुरू आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे गुजरात आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. (Maharashtra Politics)

एकनाथ शिंदे भाजपला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. कारण फडणवीसही अॅक्टिव्ह झाले असून त्यांनी बैठकांना सुरुवात केली आहे. सध्या आमदारांची हाय प्रोफाईल सोय लावण्यावरून सोशल मीडियावर चर्चांना उत आला आहे. आमदारांचं बिल थकल्याचं ट्वीट एका व्यक्तीने केलंय. गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने आमदारांना आसामला हालवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. (Eknath Shinde Latest News)

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे सुरतमधील हॉटेलचे बिल अद्याप प्रलंबित आहे. ए, बी, एबी इत्यादींच्या नावावर सरकारी अधिका-यांनी या ठिकाणी खोल्या बुक केल्या होत्या. यात मद्य बिलामधील अहवालांचा मोठा वाटा आहे. दारूमुक्त असलेल्या गुजरातमध्ये या बंडखोर आमदारांना दारूची टंचाई भासू लागली म्हणून त्यांना गुवाहाटी येथे हलवण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

केसरकरांचं स्पष्टीकरण

तुम्ही सुरतमध्ये आणि त्यानंतर गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये राहता आहात तसेच खासगी विमानाने प्रवास करत आहात याचा नेमका खर्च कोण करतंय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, असेच प्रश्न वेगवेगळ्या राज्यात विचारला जातो, दुसऱ्या पक्षाचे आमदार जेव्हा हॉटेलात जातात तेव्हा साध्या हॉटेलात राहातात का? आमच्या आमदारांचा पगार चांगला आहे, आम्ही काहीच फुकट घेत नाहीत, पैसे देत आहोत आणि ऑफिशीअली देत आहोत. त्यांच्याकडून काय असेल ती सवलत घेतो. पण पैसे भरूनच आम्ही येथे राहतोय, फुकटात तर राहत नाहीत. कोणताही पक्ष आमचा खर्च करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT