महाराष्ट्र

एसटी सेवेत उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; राज्यभरात धावल्या रिकाम्या बस 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यात कोरोनामुळे एसटी महामंडळाची सेवा सुमारे दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यानंतर आता एसटीने २२ मेपासून राज्यातील जिल्ह्यांच्या अंतर्गत सेवा सुरू केल्या आहेत. पहिल्याच दिवशी ४५७ गाड्यांमार्फत निवडक मार्गांवर २००७ फेऱ्या धावल्या आहेत; मात्र यामध्ये प्रत्येक एसटी डेपोमध्ये उत्पन्नापेक्षा डिझेल आणि नियोजनाचा खर्चच जास्त झाल्याचे दिसून येत आहे. 

एसटी महामंडळाचा सहा हजार कोटींपेक्षा जास्त संचित तोटा झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून वेळोवेळी केला जात आहे. त्यात खिळखिळ्या एसटी आणि अपघाती शिवशाहीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. अशातच गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे निव्वळ प्रवासी उत्पन्नावर अवलंबून असलेल्या एसटी महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट आहे. 

दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा एसटी महामंडळाने एसटीची जिल्ह्यांतर्गंत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र प्रवासीच मिळत नसल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये रिकाम्या बस फिरताना दिसून येत आहेत; तर अनेक बस एक ते दोन प्रवाशांसाठी धावताना दिसून येत आहेत. त्यामुळे डिझेल आणि त्याच्या नियोजनाचा खर्च एसटीला उचलावा लागत असताना उत्पन्न मात्र १२५ रुपयांपर्यंत होत असल्याचे अनेक एसटी डेपो प्रशासनाने सोशल माध्यमांवर जाहीर केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाऊननंतरही एसटीची वाट बिकट 
कोरोनामुळे प्रवासी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणे टाळताना दिसून येत आहेत. खासगी वाहने किंवा दुचाकीने नागरिकांचा प्रवास वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर एसटीला प्रवासी मिळणार का, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. प्रवासी न मिळाल्यास एसटीच्या तोट्यात मात्र प्रचंड वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

उत्पन्नाचा उन्हाळी हंगाम रिकामा 
उन्हाळ्यातील १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत एसटी महामंडळाचा उत्पन्नाचा हंगाम असतो. या काळात राज्यात लग्न समारंभ, सहली, पर्यटन यासह अनेक गोष्टींसाठी उन्हाळात एसटीची बुकिंग केली जाते; मात्र या वर्षी संपूर्ण उन्हाळा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने एसटी महामंडळाचा हंगाम रिकामा गेल्याने एसटीचे उत्पन्न बुडाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भर कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने जमिनीवर आपटलं; न्यायमूर्तीही झाले सुन्न

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT