Export of 33 lakh tonnes of agricultural commodities from the state
Export of 33 lakh tonnes of agricultural commodities from the state 
महाराष्ट्र

राज्यातून ३३ लाख टन शेतमालाची निर्यात

प्रविण डोके

पुणे : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठा आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. परंतु राज्यातून शेतीमालाची निर्यात मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातून एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत ३३, ४६,२४४.३८ लाख टन निर्यात होऊन, १८ हजार ९३०.८२ कोटी रुपयांचा शेतीमाल निर्यात झाला आहे. यामध्ये तांदळाची विक्रमी निर्यात झाली आहे तर गव्हाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली.

राज्यात पणन मंडळाच्या सुविधा केंद्रावरून मोठ्या प्रमाणात शेतीमाल निर्यात होतो. कोरोना काळात पणन मंडळाने विशेष निर्यात कक्ष स्थापन केला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना, शेतकरी कंपन्यांना निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातात. शेतमालाची निर्यात थांबू नये म्हणून विशेष निर्यात कक्षाद्वारे पॅकेजिंग मटेरिअल, मालाच्या वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध करणे, वाहनांसाठी चालक, त्याच्या जेवणाची व्यवस्था इथपासून कामामध्ये नियोजन केले. तसेच निर्यात करण्यासाठी लागणारे कंटेनर उपलब्ध करून दिले जातात.

हा शेतीमाल होतो निर्यात

राज्यातून आंबा, द्राक्ष, डाळिंब, केळी, भाजीपाला, फळे, गुलाबाची फुले, पशुखाद्य, कांदा यासह विविध शेतीमाल निर्यात केला जातो.

या देशात होतो निर्यात

अमेरिका, जपान, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड, रशिया, थायलंड, कॅनडा, न्यूझीलंड, सिंगापूर, चीन, नेपाळ, इराण व दुबई.

कोरोनाच्या कठीण कालखंडात राज्यातून समाधानकारक निर्यात झाल्याचे म्हणता येईल. खासगी निर्यातदारांचा सहभाग वाढत आहे. पणन मंडळाकडून सुविधा केंद्रे व हॉर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग दिले जाते. त्यामुळे निर्यात वाढीस मदत होत आहे.
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन मंडळ

यावर्षी प्रतिस्पर्धी देशांतून कमी निर्यात होत आहे. थायलंडमध्ये भात शेतीच्या क्षेत्रात घट झाली आहे. तर व्हिएतनाममध्ये कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती आहे. तसेच यंदा भारतात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे यंदा भारतात सर्वात जास्त तांदूळ निर्यात होत आहे.
- संदीप आगरवाल, तांदळाचे व्यापारी, मार्केट यार्ड

शेतमालाचा प्रकार, निर्यात (टनामध्ये २०१९- २०) - कोटी रुपये
तांदूळ - - ६,६५,०११.५४ - १८५५.८२
गहू - २,२९७.५५ - ६.५४
कांदा - ७,२९,५६२.६१ - १३५०.१७
द्राक्षे - १५,३,६९२.५५ - २०१८.९४
आंबा - २९, ८८३.३३ - ४०६.२४
इतर(फळे, पालेभाज्या) - १,७०,९०५८.७३ - १८, ३९३.२९



शेतमालाचा प्रकार, निर्यात टन (२०२०-२१) कोटी रुपये
( एप्रिल ते डिसेंबर)
तांदूळ - ११, ९०, ६५८.९९ - ३२३५.५
गहू - १,६० ८६.८८ - ३३.९७
कांदा - ६,७३, ०९२.३९ - ११५९.०८
द्राक्षे - ३२, ४९०.२९ - ३५६.६०
आंबा - १६, २४५.६१ - १८९.८
इतर(फळे, पालेभाज्या- १४, १७, ६७०.२२ - १३, ९५६.५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT