Dr. Amol Kolhe News esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Kolhe : नशीब बायकोला 'हे' माहिती होतं; अमृता खानविलकर संबंधीच्या व्हायरल फोटोवर कोल्हे म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः खासदार अमोल कोल्हे यांनी काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी कुठलीतरी टेक्स्ट इमेज शेअर केली आहे. त्या इमेजमध्ये अमोल कोल्हे आणि अमृता खानविलकर लवकरच लग्न करणार, असा उल्लेख आहे.

हा फोटो पोस्ट करत खासदार अमोल कोल्हे म्हणतात, हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज १ एप्रिल आहे हे माहित होतं… नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!

हेही वाचाः महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

नेमकी ती पोस्ट काय?

खासदार अमोल कोल्हे अमृता खानविलकरशी लग्न करणार, या मथळ्याखाली मजकूर लिहिण्यात आलेला आहे. त्यात म्हटलंय की, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे सध्याच्या बायकोला कंटाळले आहेत. 'वाजले की बारा' फेम अमृता खानविलकर हिच्या प्रेमात ते आहेत. लवकरच ते पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन व अमृता खानविलकर ही तिच्या पतीला घटस्फोट देऊन दोघे विवाहबद्ध होणार असल्याचे चित्रपट क्षेत्रात बोलले जात आहे. 'या विवाहाचा माझ्या राजकीय कारकीर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मीपण उपमुख्यमंत्री होऊ शकेन, कारण अमृता हे नावच लकी आहे' असं ते म्हणाले.

अशी ती पोस्ट आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी ती इमेज शेअर करत नशीब बायकोला माहितंय की आज १ एप्रिल आहे, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती, अशी टिपण्णी केली आहे. शिवाय त्यांनी 'अमृता' नावाशी संबंधित असलेल्या शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटीला दाद दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT