Dr. Shirish Valsangkar family's

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

रामवाडी गोदाम परिसरातील डॉ. वळसंगकर रुग्णालयावरील घरात डॉ. शोनाली वळसंगकर वास्तव्यास गेल्या आहेत. वळसंगकर कुटुंबीयांचा विरोध असतानाही त्या तेथे राहतात. मृत डॉ. शिरीष वळसंगकर यांचे जावई सुजय फडके यांनी डॉ. शोनाली यांना त्या ठिकाणी राहण्यास विरोध केला असून, यातून त्यांच्यात गुरुवारी वाद झाला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : रामवाडी गोदाम परिसरातील डॉ. वळसंगकर रुग्णालयावरील घरात डॉ. शोनाली वळसंगकर वास्तव्यास गेल्या आहेत. वळसंगकर कुटुंबीयांचा विरोध असतानाही त्या तेथे राहतात. मृत डॉ. शिरीष वळसंगकर यांचे जावई सुजय फडके यांनी डॉ. शोनाली यांना त्या ठिकाणी राहण्यास विरोध केला असून, यातून त्यांच्यात गुरुवारी वाद झाला. यात फडके यांनी डॉ. शोनालीविरुद्ध सदर बझार पोलिसांत तक्रार दिली आहे. तर डॉ. शोनाली यांनीही फडकेंविरोधात तक्रारीचा अर्ज दिला आहे.

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरी स्वतःच्या परवानाधारक बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूची आठवण आजही सोलापूरकर काढतात. अनेकांना देवमाणूस गेल्याची खंत आहे. मात्र, सध्या त्यांचे जावई आणि सून यांच्यात घरात राहण्यावरून वाद सुरू असल्याची बाब समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी डॉ. शोनाली अशाच पद्धतीने त्या ठिकाणी राहायला गेल्यावर त्यांना वळसंगकर कुटुंबीयांनी विरोध केला होता. त्यावेळीदेखील पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्यातील वाद तसाच सुरू राहिला. डॉ. शोनाली या काही दिवसांपूर्वी रुग्णालयावरील घरी राहायला गेल्या आहेत. त्या ठिकाणी राहण्यास फडके यांचा विरोध आहे. फडके म्हणतात, ‘‘रुग्णालय ही खासगी मालमत्ता आहे. त्या ठिकाणी डॉ. शोनाली राहू शकत नाहीत.’’ तर डॉ. शोनाली म्हणतात, ‘‘मी लग्न करून या घरात आली आहे. मी सून आहे. मला येथे राहण्याचा अधिकार आहे.’’ त्यावरून डॉ. वळसंगकर यांचे जावई फडके व सून डॉ. शोनाली यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी केल्या आहेत.

डॉ. शोनालींचा ‘डायल ११२’वर कॉल अन्‌...

गुरुवारी दुपारच्या सुमारास सुजय फडके व डॉ. शोनाली वळसंगकर यांच्यात रुग्णालयावरील घराजवळ वाद सुरू होता. त्या घरात राहणारच, अशी ठाम भूमिका डॉ. शोनाली यांची होती. तर फडके यांचा डॉ. शोनाली यांना तेथे राहण्यास विरोध होता. वाद वाढत असताना डॉ. शोनाली यांनी ‘डायल ११२’वर कॉल करून पोलिसांची मदत मागितली. त्याचवेळी सुजय फडके यांनी डॉ. शोनालीविरुद्ध पोलिसांत धाव घेतली. दोघांनीही शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी केल्याची परस्परविरोधी तक्रार दिली आहे. उद्या (शनिवारी) पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. त्यानुसार दोघेही वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्यासमोर आपले म्हणणे सविस्तरपणे मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जावई फडके हॉस्पिटलमध्ये भागीदार

मृत डॉ. शिरीष वळसंगकर यांचे जावई सुजय फडके हे पूर्वी पुण्यात राहात होते. अलिकडे ते सोलापुरात राहायला आले आहेत. डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयात त्यांची भागीदारी असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. रुग्णालय ही खासगी मालमत्ता असून, त्या आमच्या प्रॉपर्टीत डॉ. शोनाली राहू शकत नाहीत, असे फडके यांच्या तक्रारीत नमूद असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

Aloo Cheese Thecha Paratha: साधा पराठा विसराल; एकदा खा हा आलू चीज ठेचा पराठा!

आजचे राशिभविष्य - 20 जून 2026

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT