Mantralay maharashtra sakal media
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! शेतरस्त्याची होणार 7/12 वर इतर हक्कात नोंद; आता बैलगाडीचा नव्हे ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता; प्रत्येक शेतकऱ्याला ‘या’ कायद्यानुसार मिळणार रस्ता

शेतीसाठी जाण्याच्या रस्त्याचा कोणताही वाद नसेल आणि काही शेतकऱ्यांनी मिळून सामंजस्याने रस्त्याचा निर्णय घेतला असल्यास भविष्यातील वाद टाळण्यासाठी रस्त्याची नोंद आता त्या रस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात त्याची नोंद केली जाणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शेतीसाठी जाण्याच्या रस्त्याचा कोणताही वाद नसेल आणि काही शेतकऱ्यांनी मिळून सामंजस्याने रस्त्याचा निर्णय घेतला असल्यास भविष्यातील वाद टाळण्यासाठी त्या रस्त्याची नोंद आता त्या रस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात त्याची नोंद केली जाणार आहे.

गावागावात बहुतेक शेतकऱ्यांमध्ये सध्या बांधावरून आणि शेतीच्या रस्त्यावरूनच वाद होत आहेत. अशावेळी संबंधित शेतकऱ्याला रस्त्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करता येतो. त्यानंतर जमिनीची मोजणी केली जाते आणि तहसीलदार निकाल देताना त्या रस्त्याची नोंद इतर हक्कात घ्यावी, असा निकाल देतात. दरम्यान, ज्याच्या शेतातून रस्ता होणार आहे त्यास प्रांताधिकारी व अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येते. त्यावेळी मात्र निकाल तोच कायम राहिल्यास त्याची नोंद यापुढे तो रस्ता ज्यांच्या शेतातून जाणार आहे त्यांच्या सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद घ्यावी लागणार आहे. सध्या तहसीलदारांकडे ज्यांचे रस्त्याचे वाद आहेत, त्यावर निकाल देताना इतर हक्कात तीन ते चार मीटर रुंद रस्त्याची नोंद घ्यावी, असा निकाल दिला जात आहे. त्या रस्त्याबद्दल भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही हा त्यामागील हेतू आहे.

नव्या शासन निर्णयानुसार असा बदल...

महसूल विभागाच्या मामलेदार कोर्ट १९०५ नुसार पूर्वी वहिवाटीसाठी रस्ते दिले जायचे. पण, सध्या बैलगाड्या, पाऊलवाट राहिलेलीच नाही. आता बहुतेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटर आलेले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम १४३ नुसार कार्यवाही करताना प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांना या वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपारिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेल्या शेतरस्त्यांची नोंद त्या शेतकऱ्यांच्या सातबारावरील इतर हक्कात घ्यावी लागणार आहे. तसा शासन निर्णय २२ मे २०२५ रोजी महसूल विभागाने घेतला आहे.

रस्ता नसलेल्या शेतकऱ्यांसाठी...

ज्या शेतकऱ्याला शेतात ये-जा करण्यासाठी अजिबात रस्ताच नाही आणि शेजारील शेतकरी रस्ता देत नसतील तर त्या शेतकऱ्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करता येतो. त्यानंतर तहसीलदारांनी स्वत: त्याठिकाणी जाऊन स्थळी पाहणी करणे अपेक्षित आहे. त्यानंतर ते संबंधित शेतकऱ्यांना नोटीस काढतात आणि सुनावणी होऊन त्यावर अंतिम निकाल दिला जातो. त्यांचा निर्णय अमान्य असेल तर संबंधित शेतकरी प्रांताधिकाऱ्यांकडे आणि पुढे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकतो. पण, रस्ता मागणाऱ्या शेतकऱ्याला कोणताही पर्याय नसेल तर त्याला रस्ता मिळतोच, असा हा कायदा आहे.

...तर भविष्यात होणार नाहीत वाद

तहसीलदारांनी शेतरस्त्यासंदर्भात दिलेल्या निकालावर संबंधित शेतकऱ्याला प्रांताधिकारी व पुढे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्याचा अधिकार आहे. याशिवाय तो शेतकरी फेर तपासणीसाठी अपर विभागीय आयुक्त व महसूल मंत्र्यांकडे देखील अर्ज करू शकतो. पण, ज्यांचे शेतरस्ते सामंजस्याने झालेले आहेत, त्यांना इतर हक्कात त्याची नोंद करून घेता येते, जेणेकरून भविष्यात वाद होणार नाहीत.

- सचिन इथापे, प्रांताधिकारी, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevi Elephant Latest Update: अंबानींना दखल घ्यावी लागली.. महादेवी हत्तीण संदर्भात मोठी अपडेट! वनताराची टीम नांदणीला देणार भेट

Stock Market: टॅरिफ एक आठवड्यासाठी पुढे ढकलला; शेअर बाजाराचे जोरदार 'कमबॅक', कोणते शेअर्स वधारले?

Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान चहलने का घातला होता 'Be Your Own Sugar Daddy' लिहिलेला टीशर्ट; स्वत:च केला खुलासा...

Latest Marathi News Updates: "कृषी मंत्रालयाची पहिली ऑफर अजित दादांनी दिली होती" – छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

PMPML Update : सीएनजी, इलेक्ट्रिकनंतर आता हायड्रोजन बस; पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार

SCROLL FOR NEXT