CM Eknath Shinde News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Budget 2023 : जातीशिवाय खत नाही; सांगलीतल्या प्रकारावर CM शिंदे म्हणाले, "केंद्राला कळवतो..."

शेतकऱ्यांच्या बाबती अर्थसंकल्पात महत्त्वाचे निर्णय घेतल्याचंही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अधोरेखित केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

सांगलीतल्या शेतकऱ्यांना खतांसाठी जात सांगावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. अजित पवार म्हणाले, "सांगली जिल्ह्यात रासायनिक खत विकत घ्यायची असेल तर जात सांगावी लागते. तशी नोंद केली जात आहे. पण शेतकऱ्यांना जात नसते. शेतकरी हीच जात असते. खत खरेदी करताना ई-पोस मशिनमध्ये जात का नोंदवावी लागते? जात टाकली नाही तर पुढे जाता येत नाही. जातीचं लेबल पुरोगामी महाराष्ट्रात चिकटवू नका."

याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले, "खत घेताना जातीचा उल्लेख केला जातो, हा विषय विरोधी पक्षनेत्यांनी मांडला. ते पोर्टल केंद्र सरकारचं आहे. शेतकऱ्यांच्या भावना आम्ही लक्षात घेत आहोत आणि केंद्राला तसं सांगत आहोत की जात वगळून टाकावी."

मुख्यमंत्री शिंदे यांनी काल झालेल्या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना विरोधकांवर टीकाही केली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण सकारात्मक निर्णय घेतले आहेत. विरोधकांचे भ्रमाचे भोपळे फुटले, त्यामुळे ते चिडले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT