rain damage crop
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : राज्यातील २९ जिल्ह्यांमधील २५३ तालुक्यांना अतिवृष्टी व महापुराचा फटका बसला. त्यात ४७ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. भरपाईपोटी सरकारने ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज दिले. शेतकऱ्यांना दोन की तीन हेक्टर क्षेत्रासाठी भरपाई मिळणार? हा प्रश्न ‘सकाळ’ने उजेडात आणला. त्यानंतर लगेचच गुरुवारी (ता. ९) राज्य शासनाने आदेश काढले. त्यानुसार मदतीसाठी बाधित क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर केल्याचे स्पष्ट केले.
फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत सततचा पाऊस, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींचा शेतकऱ्यांनी सामना केला. पण, सप्टेंबरमध्ये सरासरीच्या दुप्पट-तिप्पट पाऊस झाला आणि २५३ तालुक्यांमधील ६० लाखांहून अधिक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालानुसार आतापर्यंत अतिवृष्टी व महापूर यामुळे सप्टेंबर महिन्यात ४७ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत भरपाई मिळणार आहे.
याशिवाय जमीन खरडून जाणे, घराला भेगा, मयत व जखमी व्यक्ती, जनावरांचा मृत्यू, विहिरीत गाळ, अशा बाबींसाठी देखील भरपाईची रक्कम निश्चित झाल्याचे शासन निर्णयात नमूद आहे. शासन निर्णयानंतर आता अधिकाऱ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांमार्फत पंचनाम्यांचे अंतिम अहवाल शासनाला सादर केले जात आहेत.
‘रविवारपर्यंत बाधितांच्या याद्या पाठवा’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. त्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि ३ हेक्टरपर्यंत मदत मिळेल, असे सांगितले. पण, पूर्वीचा शासन निर्णय दोन हेक्टरपर्यंतच्या मदतीचाच होता. त्यामुळे अधिकाऱ्यांना पंचनामे अहवाल पाठविण्यास अडचण येत होती. त्यावर ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित होताच, शासन निर्णय काढण्यात आला. आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून रविवारपर्यंत (ता. १२) बाधितांच्या याद्या पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
प्रतिहेक्टरी अशी मिळणार भरपाई
जिरायती क्षेत्र
८,५००
बागायती क्षेत्र
१७,०००
बहुवार्षिक क्षेत्र
२२,५००
रब्बीत खते-बियाणांसाठी
१०,०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.